अजिंठ्यातील अंतर्गत रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:04 AM2021-03-22T04:04:46+5:302021-03-22T04:04:46+5:30
गांधी चौक ते मोगरशहावली दर्गा व ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गाचे सिमेंटीकरणाच काम ठेकेदाराने अर्धवट अवस्थेत सोडून दिले आहे. झालेले ...
गांधी चौक ते मोगरशहावली दर्गा व ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गाचे सिमेंटीकरणाच काम ठेकेदाराने अर्धवट अवस्थेत सोडून दिले आहे. झालेले कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. पूर्वीचा जुना रस्ता या अपेक्षा रुंद होता, आता हा रस्ता अरुंद झाल्याने अतिक्रमणांचा धोका निर्माण झाला आहे. तसेच औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील पेट्रोल पंप ते अजिंठा गावातील ऐतिहासिक पारोचे स्मारक, पोलीस ठाणेमार्गे औरंगाबाद-जळगाव महामार्गाला जोडणारा जुना रस्त्याचे कामसुद्धा अर्धवटच असून अर्धे काम करून ठेकेदार गायब झाले आहेत. ठेकेदारावर संबंधित विभागाचे आशीर्वाद असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनावर अनिल ढाकरे, पवन वैष्णव, सुपडू उदणे, गजानन दसरे, ग्यानसिंग राजपूत आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो कॅप्शन : सिल्लोड येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता भोसले यांना निवेदन देताना भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अरुण चव्हाण, अंजना राजपूत.