मावेजा मिळाला नसल्याची तक्रार

By Admin | Published: September 20, 2014 11:26 PM2014-09-20T23:26:01+5:302014-09-21T00:29:51+5:30

बीड : शहरातील मास्टर प्लॅननुसार रस्ता रुंदीकरणासाठी नगर परिषदेने जागा संपादित केल्या मात्र संबंधित मिळकतदारांंना वर्षाहून अधिक कालावधी उलटुनही मावेजा देण्यात आला नाही.

Complaint is not available | मावेजा मिळाला नसल्याची तक्रार

मावेजा मिळाला नसल्याची तक्रार

googlenewsNext


बीड : शहरातील मास्टर प्लॅननुसार रस्ता रुंदीकरणासाठी नगर परिषदेने जागा संपादित केल्या मात्र संबंधित मिळकतदारांंना वर्षाहून अधिक कालावधी उलटुनही मावेजा देण्यात आला नाही. या संदर्भात जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे.
बीड नगर परिषदेच्या वतीने शहरात मास्टर प्लॅन राबविण्यासाठी सुधारिक विकास योजनेंतर्गत ११ एप्रिल रोजी राजुर वेस ते बलभीम चौक, माळीवेस या रस्त्याची मोजणी करुन रस्त्यालगतच्या व्यापाऱ्यांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्यावेळी जागा संपादित केल्यानंतर त्याचा मावेजा देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.
त्यानंतर रस्ता रुंदीकरणासाठी नोटिसा बजाविलेल्या नागरिकांच्या जागा मे-२०१३ पासून सक्तीने ताब्यात घेण्यात आल्या होत्या. याला दीड वर्षाहून अधिक कलावधी उलटूनही अद्याप नागरिकांना भूमी-अभिलेख, कार्यालयाकडून मावेजा देण्यात आला नाही. आश्वासन दिल्याने या भागातील व्यापारी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून मावेजा देण्यासंदर्भात नगर परिषदेला आदेशीत करावेत अशी मागणी या व्यापाऱ्यांतून होत आहे.
नगर परिषदेसह भूमीअभिलेख कार्यालयाकडून जनतेची फसवणुक झाल्याचा आरोप करीत मिळकत दारकांना त्वरित मावेजा वाटप करावा अशी मागणी श्रीपाद तुपकर, महेश टेकवाणी, वली मोहम्मद, अब्दुल हबीब, मुस्ताक मझरुद्दीन काझी यांनी केली आहे.
निवेदनावर बन्सीधर टेकवाणी, रविंद्र जवकर, चंदन दाणवाणी, अनिल बुद्धदेव, अब्दुल गफार, मोहम्मद हुसेन, जियाउद्दीन हाश्मी, शेख अब्दुल मतीन, राहुल जवकर, अभिनंदन जवकर, मोमीन अब्दुल वहीद, अमिनाबेगम महम्मद अयुब, शेख जाहेद, खमरुद्दीन मोहम्मद, प्रदिपसिंग बुंदेले, शेख गयाज, इश्वरलाल टेकवाणी, मोहम्मद, शकील, अभिजित दिवे, परवेझ मझरुद्दीन काझी यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Complaint is not available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.