बनावट बातमी व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात सायबर पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 08:36 PM2022-07-19T20:36:44+5:302022-07-19T20:37:19+5:30

'लोकमत'मधील बातमी बदनामीच्या उद्देशाने समाजमाध्यमात केली व्हायरल

Complaint to cyber police against those who spread fake news | बनावट बातमी व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात सायबर पोलिसात तक्रार

बनावट बातमी व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात सायबर पोलिसात तक्रार

googlenewsNext

औरंगाबाद : 'लोकमत'च्या हॅलो यवतमाळ आवृत्तीमध्ये २३ आक्टोबर २०२१ रोजी 'बंदूक साफ करताना मांडीत गोळी घुसली' या मथळ्याखाली प्रकाशित वृत्तातील एका अक्षरात आक्षेपार्ह बदल करून ते समाजमाध्यमात व्हायरल केले. याविरोधात 'लोकमत'नेऔरंगाबाद शहर साबयर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

या तक्रारीनुसार हॅलो यवतमाळमध्ये २३ आक्टोबर २०२१ रोजी प्रकाशित झालेल्या बातमीतील एका अक्षरात खाडाखोड करून १७ जुलै २०२२ रोजी समाजमाध्यमात व्हायरल केल्याचे निदर्शनास आले. यामागे 'लोकमत' वृत्तपत्राची बदनामी व्हावी या उद्देशानेच 'लोकमत'च्या ई-पेपरमधील मूळ कोड सोर्समध्ये बदल करण्यात आला असून, बनावट बातमी (दस्तावेज) मूळ 'लोकमत'ची असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बनावट बातमीत अश्लील शब्दांचा वापर केला असून, ती वाचून प्रत्येकाला लज्जा वाटेल आणि 'लोकमतविषयी अधिक गैरसमज होतील, असा प्रयत्न केल्याचेही तक्रारी म्हटले आहे. या तक्रारीनुसार समाजमाध्यमात बनावट बातमी व्हायरल करणाऱ्याचा शोध सायबर पोलीस घेत आहेत.

हा कायद्याने गुन्हा
माहिती तंत्रज्ञान कायद्यातील ६५, ६६, ६६ (सी), आणि ४३ या कलमान्वये मुळ कोड सोर्समध्ये बदल करुन समाजमाध्यमात व्हायरल करणे हा गुन्हा आहे. यानुसार गुन्हा दाखल करुन सायबर पोलीस तपास करु शकतात. तसेच आयपीसीच्या बनावट दस्तावेजाच्या कलामाप्रमाणेही गुन्हा आहे.
- हेरॉल्ड डिकॉस्टा, अध्यक्ष, सायबर सेक्युरिटी कॉर्पोरेशन, मुंबई

माहिती घेऊन कारवाई
केंद्र सरकारच्या नवीन सूचनांनुसार समाजमाध्यमांवरील आक्षेपार्ह पोस्टची सुरुवात कोठून झाली, ही माहिती देणे सेवा पुरवठादारांसाठी बंधनकारक केले आहे. त्याप्रमाणे आक्षेपार्ह मूळ पोस्ट आणि फाॅरवर्डची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.
- गौतम पातारे, वरिष्ठ निरीक्षक, सायबर शाखा

Web Title: Complaint to cyber police against those who spread fake news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.