खरीप कर्ज वितरण उद्दिष्ट तत्काळ पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:04 AM2021-07-03T04:04:16+5:302021-07-03T04:04:16+5:30
छत्र हरवलेल्या चार बालकांना आधार औरंगाबाद- सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे ३० जून रोजी संगीता व संतोष पाडळे या दाम्पत्याने ...
छत्र हरवलेल्या चार बालकांना आधार
औरंगाबाद- सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे ३० जून रोजी संगीता व संतोष पाडळे या दाम्पत्याने घरगुती वादातून आत्महत्या केली. दुर्दैवी घटनेची तत्काळ दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी अनाथ झालेल्या चार बालकांना मदत करण्याचे आदेश दिले होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गणेश पुंगळे यांनी सदर बालकांची भेट घेऊन मानसिक आधार दिला. चारही बालके निराधार व अनाथ झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास विभागाअंतर्गत कार्यरत बालगृहामध्ये प्रवेशित करून त्यांचे संपूर्ण संगोपन केले जाणार आहे. जिल्हा कृती दलाच्या मार्फत बालकांना मदत करण्यात येणार आहे. त्या बालकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.