औरंगाबादेत आज आणि उद्या पूर्ण लॉकडाऊन; परवानगी असलेल्या सेवाच सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 12:44 PM2021-03-13T12:44:29+5:302021-03-13T12:45:40+5:30

lockdown in Aurangabad प्रशासनाने सूट दिलेल्या आणि सशर्त परवानगी दिलेल्या यंत्रणाच या काळात सुरू राहणार आहेत

Complete lockdown in Aurangabad today and tomorrow; Permitted services will continue | औरंगाबादेत आज आणि उद्या पूर्ण लॉकडाऊन; परवानगी असलेल्या सेवाच सुरू राहणार

औरंगाबादेत आज आणि उद्या पूर्ण लॉकडाऊन; परवानगी असलेल्या सेवाच सुरू राहणार

googlenewsNext
ठळक मुद्देशुक्रवारी ६१७ कोरोनाबाधितांची भर, ६ मृत्यूशनिवार आणि रविवार १०० टक्के लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात ११ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत अशंत: तर आठवड्यातील प्रत्येक शनिवार आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या कळात सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत शहर आणि ग्रामीण भागातील जनजीवन सुरळीत राहील. प्रशासनाने सूट दिलेल्या आणि सशर्त परवानगी दिलेल्या यंत्रणाच या काळात सुरू राहणार आहेत. संयुक्तपणे सर्व प्रशासकीय यंत्रणा या काळात एकत्रित काम करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

बुधवारी मुख्य सचिव आणि केंद्रीय पथकाने औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णवाढीच्या अनुषंगाने चिंता व्यक्त केली आहे. केंद्रीय पथकाने देखील प्रशासनाला सतर्कतने काम करण्याच्या सूचना केल्या आहे. येणाऱ्या पंधरवड्यात सक्षमतेने काम करावे लागणार असून नागरिकांनादेखील स्वत:ची काळजी घ्यावी लागणार आहे.

या संस्थांना मुभा राहील
शनिवार आणि रविवार १०० टक्के लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या काळात वैद्यकीय सेवा, वृत्तपत्र, मीडिया सेवा, दूध व्रिक्री व पुरवठा इ. भाजीपाला विक्री व पुरवठा, फळेविक्री व पुरवठा, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, पेट्रोलपंप, गॅस एजन्सी, सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा, बांधकामे, उद्योग व कारखाने, किराणा दुकाने, मांसविक्री दुकाने, वाहन दुरुस्ती दुकाने, गॅरेज, वर्कशॉप, पशुखाद्य दुकाने, बँक व पोस्ट सेवा सुरू राहतील.

या संस्था बंद असतील
दुकाने व बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स, मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, हॉटेल, रेस्टॉरंट (फक्त होम डिलीव्हरीला मुभा ), खासगी कार्यालय, आस्थापना बंद असतील.

शुक्रवारी ६१७ कोरोनाबाधितांची भर, ६ मृत्यू
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची उच्चांकी वाढ सुरूच असून, शुक्रवारी तब्बल ६१७ नव्या बाधितांची भर पडली, तर सहा बाधितांचा मृत्यू झाला. दिवसभरात उपचार पूर्ण झाल्याने मनपा हद्दीतील २०८ तर ग्रामीण भागातील ७० जणांना सुट्टी देण्यात आली.आजपर्यंत जिल्ह्यात ५५ हजार ९५८ बाधित रुग्ण आढळले. त्यापैकी ५० हजार १६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत १,३२६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या विविध रुग्णालयांत ४ हजार ४६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले.

Web Title: Complete lockdown in Aurangabad today and tomorrow; Permitted services will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.