पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण

By Admin | Published: June 13, 2014 11:56 PM2014-06-13T23:56:44+5:302014-06-14T01:20:23+5:30

जालना: पोलिस दलातील १३९ रिक्त पदासाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली. यात २ हजार ४९१ उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली.

Complete the recruitment process | पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण

पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण

googlenewsNext

जालना: पोलिस दलातील १३९ रिक्त पदासाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली. यात २ हजार ४९१ उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली. त्यांची लेखी परीक्षा १८ जून रोजी होणार असल्याचे पोलिस उपअधिक्षक (गृह) आर. टी. वसावे यांनी सांगितले.
येथील पोलिस कवायत मैदानावर ५ जूनपासून प्रक्रिया सुरू झाली. जिल्ह्यातील एकूण १३९ जागांसाठी ४ हजार ८४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३ हजार ६३२ उमेदवार मैदानी चाचणीसाठी हजर झाले होते. ४०४ महिला उमेदवारांनी मैदानी दिली. त्यापैकी २३९ पात्र ठरल्या आहेत.
या चाचणीत एकूण २ हजार ४९१ उमेदवार पात्र ठरले त्यांना क्रमांक देण्यात आले आहेत. मैदानी चाचणीचा निकाल १७ जून रोजी लागणार आहे. त्यानंतर १८ जून रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे वसावे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Complete the recruitment process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.