रखडलेली कामे पूर्ण करा अन्यथा आंदोलन
By | Published: December 2, 2020 04:09 AM2020-12-02T04:09:13+5:302020-12-02T04:09:13+5:30
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील रखडलेली विकास कामे पूर्ण करावी अन्यथा कृती समितीच्या वतीने २१ डिसेंबरपासून सिडको प्रशासनाविरोधात ...
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील रखडलेली विकास कामे पूर्ण करावी अन्यथा कृती समितीच्या वतीने २१ डिसेंबरपासून सिडको प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सिडको वाळूज महानगर बचाव कृती समितीची रविवारी ए. एस. क्लब परिसरात बैठक झाली. कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे, तर प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्रसिंग यादव, चंद्रकांत चोरडिया आदींची उपस्थिती होती. नागेश कुठारे म्हणाले की, सिडको प्रशासनाने वाळूज महानगरचा प्रकल्प रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा, यासाठी कृती समितीच्या माध्यमातून सिडको प्रशासन व राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. सिडकोने प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या परिसरातील विकासकामे रखडली आहेत. आजघडीला सिडको वाळूज महानगर १, २ व ४ मधील रस्ते, ड्रेनेजलाईन, पाणी, मलनि:सारण प्रकल्प, ले-आउट मंजुरीचे प्रकरण, क्रीडांगण, पुलांची उभारणे, स्मशानभूमी आदी कामांना ब्रेक लावण्यात आल्याचा आरोप बैठकीत नागरिकांनी केला. याप्रसंगी शीतल गंगवाल, चंद्रकांत चोरडिया, संतोष गाढे, माणिक कुलकर्णी, सुशीलकुमार सावंत, अनिल माळवदे, प्रशांत वडांगळे, प्रकाश जाधव, कुंवर दयालसिंग, प्रमोद नाईक, प्रशांत शिंपी, चिंतामण शेट्टे, आप्पासाहेब गायके, विजय कसबे, गोविंद, रोहिदास लोहार, संजय महाजन, प्रज्योत मादळे, फकीरचंद दाभाडे, डॉ. विशाल जैन, नीलेश भारती, कमलकिशोर काबरा आदींची उपस्थिती होती.