लसीकरण १६ मार्चपर्यंत पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:03 AM2021-03-15T04:03:51+5:302021-03-15T04:03:51+5:30
औरंगाबाद : खासगी दवाखान्यातील कर्मचारी त्याचप्रमाणे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य कर्मचारी, सर्व फ्रंटलाईन वर्कर या सर्वांचे लसीकरण १६ ...
औरंगाबाद : खासगी दवाखान्यातील कर्मचारी त्याचप्रमाणे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य कर्मचारी, सर्व फ्रंटलाईन वर्कर या सर्वांचे लसीकरण १६ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लसीकरण मोहिमेच्या आढावा बैठकीत चव्हाण बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, डॉ. विजय वाघ, डॉ. नीता पाडळकर, डॉ. सुंदर कुलकर्णी, डॉ. एस. शेळके, डॉ. चौधरी उपस्थित होते.
घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी
औरंगाबाद : शहरामधून निर्माण होणाऱ्या नागरी घनकचऱ्यावर प्रक्रियेसाठी पडेगाव, कांचनवाडी, चिकलठाणा येथे उभारण्यात आलेल्या नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पांची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पाहणी केली. घनकचरा प्रक्रिया करताना निर्माण होणाऱ्या लिचेट कलेक्शन टँकमधील प्रदूषित पाण्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करूनच योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागास दिले. यावेळी तहसीलदार ज्योती पवार, अप्पर तहसीलदार किशोर देशमुख, महाराष्ट्र प्रदूषण नियामक बोर्डचे प्रादेशिक अधिकारी प्रवीण जोशी, उपप्रादेशिक अधिकारी प्रदीप वानखेडे, क्षेत्र अधिकारी रविराज पाटील, डॉ.गजानन खडकीकर, मनपा घनकचरा व्यवस्थापन केंद्रप्रमुख नंदकिशोर भोंबे आदी उपस्थित होते.
अंशत: लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन
औरंगाबाद : अंशत: लॉकडाऊनमध्ये अन्न आस्थापना सुरू ठेवण्याचा कालवधी व उपाययोजनांची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासनाने केली आहे. ४ एप्रिलपर्यंत नियमांचे पालन न केल्यास संबंधितांविरुध्द कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त उदय वंजारी यांनी दिला आहे.