बायपासचे काम पूर्ण, मेहनत केल्याचे समाधान - क्षीरसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:19 AM2017-09-30T00:19:42+5:302017-09-30T00:19:42+5:30
बीड शहरापासून जाणारा हा १२ किलोमिटरचा बायपास आज पूर्ण झाला असून रस्ता सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येडशी ते औरंगाबाद हा चार पदरी रस्ता करण्याचा प्रस्ताव तत्कालीन सरकारच्या काळात सादर करण्यात आला होता. त्यानंतर लगेच डीपीआर तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. १९० किलोमिटर लांबीचा आणि १८०० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आपल्या कार्यकाळात मार्गी लावत असताना अनेक अडचणी पार करून हे काम पूर्णत्वास जात आहे. बीड शहरापासून जाणारा हा १२ किलोमिटरचा बायपास आज पूर्ण झाला असून रस्ता सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या कामासाठी केलेले प्रयत्न आणि मेहनत याबाबत आज आपण समाधानी असल्याचे आ. जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले.
शुक्र वारी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी कामाची पाहणी केली. यावेळी आय.आर.बी.चे प्रकल्प संचालक चौरे आणि नॅशनल हायवेचे घोटकर , तसेच दिनकर कदम, विलास बडगे, अरूण डाके, डॉ. योगेश क्षीरसागर, अॅड.शेख शिफक, अॅड.सय्यद खाजा, विलास विधाते, वैजनाथ तांदळे, राजेंद्र पवार, अशोक हिंगे, अरूण डाके, बबन गोरे, विलास बोबडे, अरूण बोंगाणी, धनंजय वाघमारे, दत्ता गायकवाड, अॅड.महेश धांडे आदि उपस्थित होते.
पाहणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आ. क्षीरसागर यांनी या बायपासच्या कामाच्या बाबतीत संपूर्ण माहिती पत्रकारांना दिली. शहरापासून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग २११ वर सातत्याने अपघात होऊन अनेक नागरिकांचे प्राण गेले. यासाठी शहराच्या बाहेरून बायपास रस्ता करणे आवश्यक झाले त्यामुळे याबाबतीत आपण प्रयत्न करण्यास सुरवात केली. बायपास करत असताना शहराच्या पुर्वेला करावा की पश्चिमेला याबाबत वेगवेगळी मत मतांतरे आली. हा निर्णय घेण्यासाठी बीड येथील स्व.यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात तत्कालीन प्रकल्प संचालक चामल गोरे यांनी जनसुनावणी घेऊन हा बायपास पूर्व बाजूने करण्याचा निर्णय झाला. या रस्त्याचा प्रस्ताव परिपूर्ण करून केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला तेंव्हा केंद्रीय पर्यावरण विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक होते. यासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांच्याशी भेटून या प्रकल्पाला सहकार्य करण्याची विनंती केली. त्यानंतर नाहरकरत प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले. येडशी ते औरंगाबाद हा रस्ता चौपदरी करण्यात यावा अशी मागणी त्याच वेळी आपण तत्कालीन केंद्रीय रस्ते विकास मंत्री कमलनाथ व सि.पी. जोशी यांची अनेक वेळा भेट घेऊन या प्रकल्पास मंजूरी मिळवून घेतली. बीड शहरातून वाढत्या रहदारीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते त्यामुळे भूसंपादनाचे काम तात्काळ करून घेण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी नविलकशोर राम यांच्या माध्यमातून हे काम पूर्णत्वास आले. आज बीड बायपासचे काम पूर्ण होऊन तो जनतेसाठी वाहतुकीला खुला होत आहे यात आपण केलेल्या प्रयत्नाला आणि मेहनतीला यश आल्याचा आनंद माझ्यासह संपूर्ण बीडकरांना झाला आहे, असेही आ. क्षीरसागर यांनी सांगितले.