सिल्लोड येथील कोविड सेंटरचे काम येत्या १५ दिवसांत पूर्ण करा : अब्दुल सत्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:05 AM2021-05-05T04:05:21+5:302021-05-05T04:05:21+5:30
सिल्लोड येथील कोविड सेंटरमध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बेड असावे, प्रत्येक बेडला ऑक्सिजनची सुविधा असावी या पद्धतीने उपाययोजना कराव्यात, ...
सिल्लोड येथील कोविड सेंटरमध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बेड असावे, प्रत्येक बेडला ऑक्सिजनची सुविधा असावी या पद्धतीने उपाययोजना कराव्यात, त्यासोबतच कोविड सेंटर येथे अत्याधुनिक ऑक्सिजन प्लांट, एक्स्प्रेस लाइन असलेला विद्युतपुरवठा, डॉक्टरांसाठी कॅबिन, स्वतंत्र पाणीपुरवठा याबाबत वाढीव तरतूद करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. कोरोनाच्या दुसऱ्या व तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात ७ आणि सोयगाव येथील शासकीय रुग्णालयात ५ असे १२ व्हेंटिलेटर्ससाठी तसेच एक हजार रेमडेसिविर खरेदीसाठी शासनस्तरावर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, माधुरी तिखे, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी अशोक दांडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी मराठे, पूजा गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित सरदेसाई, वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश राठोड आदी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : सिल्लोड येथे सुरू असलेल्या कोविड सेंटर कामाची पाहणी करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार. समवेत अधिकारी, कर्मचारी.
030521\img-20210503-wa0321_1.jpg
सिल्लोड येथे सुरू असलेल्या कोव्हिड सेंटर कामाची पाहणी करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार सोबत अधिकारी, कर्मचारी.