संत एकनाथ रंगमंदिराचे काम लवकर पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:05 AM2021-01-22T04:05:27+5:302021-01-22T04:05:27+5:30

औरंगाबाद : शहरातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत आहे. गुरुवारी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १८७ एवढी खाली आली आहे. असे ...

Complete the work of Sant Eknath Rangmandir soon | संत एकनाथ रंगमंदिराचे काम लवकर पूर्ण करा

संत एकनाथ रंगमंदिराचे काम लवकर पूर्ण करा

googlenewsNext

औरंगाबाद : शहरातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत आहे. गुरुवारी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १८७ एवढी खाली आली आहे. असे असले तरी जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर महापालिकेचा भर आहे. दररोज ८०० ते ९०० जणांचे स्वॅब घेतले जात आहेत, असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. महापालिकेने १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू केले आहे. आजवर २४ हजार ३२४ पैकी ८६१ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. आठवड्यातील मंगळवार, बुधवार, शुक्रवार व शनिवारी लसीकरण केले जाणार आहे.

कोषागार संघटनेच्या अध्यक्षपदी भानुदास निलावाड

औरंगाबाद : जिल्हा कोषागार कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी भानुदास निलावाड यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष बालाजी परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कार्यकारिणीची निवड झाली.

उपाध्यक्षपदी विनोद साळवे, संजय ब्राह्मणे, सचिवपदी चंद्रकांत अवचार, संदीप देशपांडे, यासह दिवाकर भालेराव, ज्ञानेश्वर कोलते, विजय देशपांडे, शिवाजी तरटे, कल्याण चौथे, राहुल मगरे, अशोक जगदाळे, विनोद दारवंटे, फकीरचंद बहुरे, दीपक जोनवाल, संतोष ताठे, वैशाली सोनगिरे, गीता सुरासे, जयश्री गायकवाड, ज्ञानेश्वर टकले, रावसाहेब जाधव, सुरेश गजभारे, राजू दुधे, गणेश बोगूलवार, अमोल गव्हादे, अक्षय भोसले यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.

संत एकनाथ रंगमंदिराचे काम लवकर पूर्ण करा

औरंगाबाद : संत एकनाथ रंगमंदिराचे रखडलेले काम लवकर पूर्ण करावे, अशा सूचना महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांना केली. संत एकनाथ रंगमंदिर आणि संत तुकाराम नाट्यगृहाची पाहणी पाण्डेय यांनी केली. संत तुकाराम नाट्यगृहाच्या छताचे प्लास्टर पडत असल्याने ते नाट्यगृह दुरुस्तीपर्यंत बंद ठेवण्यात आले होते, असे अधिकाऱ्यांनी प्रशासकांना सांगितले. यानंतर पाण्डेय हे शिवाजीनगर ते विश्रांतीनगर रस्त्याची पाहणी करत असताना काही नागरिकांनी मोबदल्याचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला. यावेळी बाधित मालमत्तांची कागदपत्रे गोळा करण्याचा आदेश आयुक्तांनी सबंधितांना दिला. यावेळी राजेंद्र जंजाळ, शहर अभियंता सखाराम पानझडे, नगररचना सहायक संचालक जयंत खरवडकर, कार्यकारी अभियंता ए.बी. देशमुख उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पारिजातनगरची पाहणी करीत रस्त्यांचा आढावा घेतला. पारिजातनगरला पुंडलिकनगर ते जयभवानीनगर मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याचे काम करण्यासंदर्भात प्रमोद राठोड यांच्याशी चर्चा केली.

मराठवाड्यात ७,२२० जणांना दिली लस

औरंगाबाद : मराठवाड्यात १६, १९ आणि २० जानेवारी रोजी केलेल्या लसीकरणामध्ये ११ हजार ७०० पैकी ७ हजार २२० जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. लसीकरणासाठी नोंदणी करूनही डॉक्टर्स तसेच आरोग्य कर्मचारी फारसे उत्सुक दिसत नसल्याचे चित्र विभागात आहे. दररोज ३ हजार ९०० लाभार्थ्यांना लस टोचण्याचे लक्ष्य आहे. या तुलनेत १६ जानेवारी रोजी ७२.५ टक्के, १९ जानेवारी रोजी ४५.९५, तर २० जानेवारी रोजी ६७.१३ टक्के, असे लसीकरण झाले. १६ जानेवारी या पहिल्याच दिवशी आठही जिल्ह्यांत ३,९०० पैकी केवळ २,८१० जणांनाच लस दिली. १९ जानेवारी रोजी पुन्हा लसीकरण करण्यात आले. यादिवशी १,७९२ तर २० जानेवारी रोजी २,६१८ जणांनाच लस टोचण्यात आली.

Web Title: Complete the work of Sant Eknath Rangmandir soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.