घाटीत बायोमेडिकल वेस्ट कक्षाचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:12 PM2019-01-29T23:12:37+5:302019-01-29T23:13:01+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) बायोमेडिकल वेस्ट साठविण्यासाठी नव्या जागेत कक्षाचे बांधकाम अखेर पूर्ण झाले आहे.
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) बायोमेडिकल वेस्ट साठविण्यासाठी नव्या जागेत कक्षाचे बांधकाम अखेर पूर्ण झाले आहे. याठिकाणी वर्गीकरणानुसार कचरा साठविण्यात येणार असल्याने यापुढे उघड्यावर वैद्यकीय घनकचरा साठविण्याचा प्रकार बंद होईल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
घाटीत मूत्रपिंड विकार विभागाच्या परिसरात बायोमेडिकल वेस्ट साठविल्याने मोकाट कुत्र्यांच्या तोंडी मानवी मांसाचे गोळे आढळून आले. यासंदर्भात ‘लोकमत’ने १८ डिसेंबर रोजी प्रकाशित केलेल्या वृत्ताची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घाटीत पाहणी केली. यावेळी अधिकाºयांनी कचºयाचे वर्गीक रण, चुकीच्या पद्धतीने खड्ड्यांमध्ये विल्हेवाट आणि उघड्यावर बायोमेडिकल वेस्ट साठविणे यावर बोट ठेवले.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावून उघड्यावर बायोमेडिकल वेस्ट साठविण्याचा प्रकार बंद करण्याची सूचना केली. त्यामुळे घाटी प्रशासनाकडून मूत्रपिंड विकार विभागाच्या परिसरात मोकळ्या जागेत कचरा साठविणे बंद करण्यासाठी अन्य जागेचा शोध घेण्यात आला. अखेर शवविच्छेदनगृहासमोरील जागा निश्चित झाली. जागा निश्चित झाल्यानंतर कचरा साठविण्यासाठी कक्षाचे बांधकाम करण्यात आले आहे.
याठिकाणी वर्गीकरणानुसार कचरा साठविण्यासाठी रचना केली आहे. त्यामुळे कचरा उघड्यावर साठविण्याचा प्रकार बंद होणार आहे. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांनी मंगळवारी नव्या कक्षाची पाहणी केली. कचºयाच्या वर्गीकरणासंदर्भात कर्मचाºयांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे. कचºयाचे वर्गिकरण योग्य होत आहे का नाही,याची वॉर्डांना अचानक भेटी देऊन पाहणी केली जाणार असल्याचे डॉ. येळीकर यांनी सांगितले.