पैठण रोडचे काम १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 01:09 AM2017-09-20T01:09:21+5:302017-09-20T01:09:21+5:30

महानुभाव आश्रम ते लिंक रोडपर्यंत या २ कि़मी. अंतरातील काम १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल

Completion of work of Paithan road till November 15 | पैठण रोडचे काम १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण

पैठण रोडचे काम १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महानुभाव आश्रम ते लिंक रोडपर्यंत या २ कि़मी. अंतरातील काम १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशा पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाने तयारी सुरू केली आहे. एका दिशेचा रोड वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे वाहनकोंडीचा त्रास थोडा कमी झाला आहे.
महानुभाव आश्रम ते लिंक रोड या पैठण रोडवरील दोन कि़मी.च्या कामामुळे नागरिकांना मागील काही महिन्यांपासून प्रचंड त्रास सहन करून शहरात ये-जा करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्या रोडचे काम करण्यात येत आहे. एका बाजूचे काम पूर्ण होऊन त्यावरून वाहतूक सुरू केली आहे. पुलावरील स्लॅबचे काम अजून बाकी आहे. कंत्राटदार जीएनआयने लिंक रोड ते महानुभाव आश्रम पोलीस चौकीपर्यंत दुसºया बाजूचा रोड खोदला असून, त्यावर दबाईचे काम सध्या सुरू आहे. रोड खोदताना जलवाहिनी, ड्रेनेज वाहिन्या दबल्या होत्या. त्यामुळे मध्यंतरी नागरिकांची कुचंबणा झाली होती.
अभियंता म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी सांगितले, आॅक्टोबर अखेरपर्यंत दोन्ही बाजूचे काँक्रीट पूर्ण होईल. नोव्हेंबर महिन्याच्या पूर्वार्धात डांबरी रोड व साइडड्रेन व इतर कामे पूर्ण होतील. १५ नोव्हेंबरपासून रोड वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने खुला होईल. पुलाच्या स्लॅबचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.
चार महिन्यांपासून त्या रोडचे काम सुरू आहे. आधुनिक मशिनरीच्या साह्याने काम सुरू असतानाही पैशांअभावी ते काम रखडले होते. आता शासनाने त्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे.

Web Title: Completion of work of Paithan road till November 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.