दसरा खरेदीला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 12:45 AM2017-10-01T00:45:39+5:302017-10-01T00:45:39+5:30

साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त असलेल्या दसरा या सणाला नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र, यंदा महिनाअखेरीस दसरा आल्याने व जीएसटी लागू झाल्यानंतरची मंदी अजूनही टिकून असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून आला.

Composite response to purchasing in Dasara | दसरा खरेदीला संमिश्र प्रतिसाद

दसरा खरेदीला संमिश्र प्रतिसाद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त असलेल्या दसरा या सणाला नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र, यंदा महिनाअखेरीस दसरा आल्याने व जीएसटी लागू झाल्यानंतरची मंदी अजूनही टिकून असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून आला. बँकांच्या सुलभ अर्थसाह्याच्या जोरावर अनेकांनी नवीन वस्तू खरेदी केल्यामुळे बाजारात काही प्रमाणात वर्दळ दिसली. पण मागील वर्षीच्या तुलनेत यंदा प्रतिसाद कमी दिसला.
सराफा बाजारात स्थिरता
दसºयाच्या मुहूर्तावर आवर्जून सोने खरेदी केले जाते. विशेषत: दागिन्यांपेक्षा प्युअर सोने खरेदी जास्त प्रमाणात होत असते. मात्र, दसºयाच्या मुहूर्तावर नेहमीसारखी वर्दळ सराफा बाजारात दिसून आली नाही. दुपारनंतर बाजारात ग्राहकी दिसून आली. तेही नामांकित शोरूममध्येच. आज ३०,६०० रुपये प्रतितोळा भावाने सोने विकल्या जात होते. अनेकांचा ग्राहकांची प्रतीक्षा करण्यातच दिवस निघून गेला.
८० नवीन घरांची बुकिंग
क्रेडाईचे अध्यक्ष रवी वट्टमवार यांनी सांगितले की, यंदाच्या ‘ड्रीम होम’ गृहप्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. विविध बिल्डर्सकडे २५० ग्राहकांनी घर खरेदीची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर प्रत्यक्ष साईटवर भेट देऊन ८० जणांनी आज दसºयाच्या मुहूर्तावर फ्लॅट, रो-हाऊस, शोरूम खरेदी केले. येत्या दिवाळीपर्यंत रिअल इस्टेट क्षेत्रात मागणी वाढणार आहे. कारण आज अनेकांनी विविध साइटवर जाऊन पाहणी केली. तसेच बिल्डर्सच्या आॅफिसवर जाऊन अनेकांनी गृहप्रकल्पांची माहितीही घेतली आहे. याचा सकारात्मक परिणाम दिवाळीपर्यंत दिसून येईल.

Web Title: Composite response to purchasing in Dasara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.