आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली, कोरोनाने १८ महिन्यांच्या आणि १२ वर्षीय मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 03:32 PM2022-01-27T15:32:33+5:302022-01-27T15:33:30+5:30

एका १८ महिन्याच्या बालिकेचा आणि एका १२ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

Concern for the health system increased, with Corona killing two girls in the third wave | आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली, कोरोनाने १८ महिन्यांच्या आणि १२ वर्षीय मुलीचा मृत्यू

आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली, कोरोनाने १८ महिन्यांच्या आणि १२ वर्षीय मुलीचा मृत्यू

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रथमच दोन लहान मुलांचा बळी गेला आहे. घाटीत उपचार सुरु असताना एका १८ महिन्याचा मुलीचा मृत्यू झाला आहे. तर खाजगी रुग्णालयात एका १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

पडेगाव परिसरातील १८ महिन्यांच्या मुलीला २४ जानेवारी रोजी घाटीत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु अशताना २५ जानेवारी रोजी सायंकाळी या चिमुकलीने अखेरचा श्वास घेतला. तर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना राजाबाजार, कुवारफल्ली येथील १२ वर्षीय मुलीचा २६ जानेवारी रोजी मृत्यू झाला. मेंदूत इन्फेक्शन झाल्यामुळे या मुलीवर उपचार सुरु होते. कोरोनाचा चाचणी केली असता ती पाॅझिटिव्ह आली, असे मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

जिल्ह्यात बुधवारी ९५८ बाधितांची भर
जिल्ह्यात बुधवारी ७४३ जणांना (मनपा ५८९, ग्रामीण १५४ ) सुटी देण्यात आली. तर एकूण ९५८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. यात महापालिका क्षेत्रात ६७५ तर ग्रामीण भागात २८३ रुग्ण आढळून आले. तर घरी रुग्णालयात १ आणि खाजगी रुग्णालयात १ रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लक्ष ६३ हजार ९९३  झाली आहे. आजपर्यंत एकूण ३ हजार ६८० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ८ हजार ५०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: Concern for the health system increased, with Corona killing two girls in the third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.