शेंद्रा-ऑरिक सिटीमधील उद्योगांवर सवलतींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 01:38 PM2020-10-30T13:38:04+5:302020-10-30T13:46:49+5:30

केंद्र शासनाच्या रसायन व खते मंत्रालयाने किफायतशीर दरात औषधी उपलब्ध होण्याकरिता बल्क ड्रग हब उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

Concession rains on industries in Shendra-Auric City | शेंद्रा-ऑरिक सिटीमधील उद्योगांवर सवलतींचा पाऊस

शेंद्रा-ऑरिक सिटीमधील उद्योगांवर सवलतींचा पाऊस

googlenewsNext
ठळक मुद्देमंत्रिमंडळाचा निर्णयवैद्यकीय उपकरण पार्कला लाभ

औरंगाबाद/मुंबई : डीएमआयसी-शेंद्रा ऑरिक सिटीमध्ये ४२४ कोटी रूपयांच्या वैद्यकीय उपकरण पार्कसाठी विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आणि कंपन्यांवर सवलतींचा अक्षरश: पाऊस पाडला. याशिवाय रायगड औद्योगिक वसाहतीतील २४४२ कोटींच्या बल्क ड्रग (औषधी)साठीही सवलती जाहीर केल्या. हे प्रोत्साहन पाच वर्षांसाठी असेल.

केंद्र शासनाच्या रसायन व खते मंत्रालयाने किफायतशीर दरात औषधी उपलब्ध होण्याकरिता बल्क ड्रग हब उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात राज्य शासनाचा सहभाग असेल. एकूण तीन ड्रग हब उभारले जातील. औरंगाबादच्या ऑरिक सिटीमध्ये चार वैद्यकीय उपकरणे निर्मिती पार्क असतील.  बल्क ड्रग हबसाठी  मूलभूत सुविधा उभारण्याकरिता जास्तीत जास्त एक हजार कोटी रुपये किंवा एकूण खर्चाच्या ७० टक्के अनुदान दिले जाईल. रायगडच्या हबसाठी मूलभूत सुविधांकरता १०० कोटी रुपये देण्यात येतील. 
 

Web Title: Concession rains on industries in Shendra-Auric City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.