गुरु-ता-गद्दी गुरपुरब सोहळ्याचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 01:09 AM2017-10-27T01:09:18+5:302017-10-27T01:09:18+5:30

गुरु-ता-गद्दी गुरपुरब सोहळ्यानिमित्त गुरुवारी सायंकाळी भव्य नगरकिर्तन काढण्यात आले़ या नगर किर्तनात हजारो भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला़ शहरात ठिकठिकाणी या नगरकिर्तनचे स्वागत करण्यात आले़

The concluding of the guru-ta-gaddi gurupur ceremony | गुरु-ता-गद्दी गुरपुरब सोहळ्याचा समारोप

गुरु-ता-गद्दी गुरपुरब सोहळ्याचा समारोप

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : गुरु-ता-गद्दी गुरपुरब सोहळ्यानिमित्त गुरुवारी सायंकाळी भव्य नगरकिर्तन काढण्यात आले़ या नगर किर्तनात हजारो भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला़ शहरात ठिकठिकाणी या नगरकिर्तनचे स्वागत करण्यात आले़
येथील श्री सचखंड गुरुद्वारात २१ आॅक्टोबर ते २६ आॅक्टोबर या कालावधीत गुरु-ता-गद्दी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले़ शहरातील श्री गुरुग्रंथ साहीब भवन येथे विशेष गुरमत समागम घेण्यात आला़ या समागम कार्यक्रमात देशभरातील किर्तनकार सहभागी झाले होते़
गुरु-ता-गद्दी गुरपुरब सोहळ्याचा समारोप गुरुवारी सायंकाळी भव्य नगरकिर्तनाने करण्यात आला़ श्री गुरुग्रंथ साहिब भवन येथुन नगरकिर्तनास प्रारंभ झाला़ या नगरकिर्तनमध्ये संत बाबा बलविंदरसिंघ यांच्यासह गुरु महाराजांचे घोडे, पालखी साहब, निशान साहिब तसेच मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले होते़ हे नगरकिर्तन रणजीत सिंहजी यात्री निवासमार्गे अबचलनगर कॉलनी- भगतसिंह रोड- जुना मोंढा-गुरु गोविंदसिंघजी मार्ग- हल्लाबोल चौक- वजीराबाद- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे श्री सचखंड गुरुद्वारा पर्यंत निघाले होते़
दरम्यान बुधवारी किर्तन दरबारमध्ये भाई सुखवंतसिंहजी हजुरी रागी दरबार, संतबाबा हरीसिंह, ग्यानीभाई रणजीतसिंह आदी सहभागी झाले होते.

Read in English

Web Title: The concluding of the guru-ta-gaddi gurupur ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.