सिडको नाट्यगृहाच्या खाजगीकरणास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 01:03 AM2018-02-10T01:03:20+5:302018-02-10T01:03:23+5:30

सिडको नाट्यगृह महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरत आहे. दरवर्षी ३५ लाख रुपये नाट्यगृहाच्या देखभाल दुरुस्तीवर खर्च येत आहे. यातून उत्पन्न काहीच नाही.

 Conflict of privatization of CIDCO theater | सिडको नाट्यगृहाच्या खाजगीकरणास विरोध

सिडको नाट्यगृहाच्या खाजगीकरणास विरोध

googlenewsNext

औरंगाबाद : सिडको नाट्यगृह महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरत आहे. दरवर्षी ३५ लाख रुपये नाट्यगृहाच्या देखभाल दुरुस्तीवर खर्च येत आहे. यातून उत्पन्न काहीच नाही. खर्चाचा कुठेच ताळमेळ बसत नाही, त्यामुळे खाजगी संस्थेमार्फत नाट्यगृह चालविण्याच्या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध दर्शविला. पुढील सर्वसाधारण सभेत याबाबतचा ठराव ठेवण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले.
नेहरू भवनचा प्रस्ताव
नेहरू भवनच्या दुरवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी नेहरू भवनचा वापर सध्या लग्नासाठी होत असल्याचा खुलासा केला.
त्याला एमआयएम पक्षाच्या सायरा बानो अजमल खान व इतर सदस्यांनी जोरदार विरोध केला. नेहरू भवनचा प्रस्तावही पुढील सभेत ठेवण्यात येणार आहे.

Web Title:  Conflict of privatization of CIDCO theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.