योजनेबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2016 11:11 PM2016-05-31T23:11:50+5:302016-05-31T23:14:42+5:30

पाटोदा : दारिद्रय रेषेखालील व बेघर कुटुम्बांना निवारा देण्याच्या हेतूने असणारी ‘आवास’ योजना बंद करण्यात आली आहे. नव्याने ‘प्रधानमंत्री आवास’ योजना घोषित करण्यात आली आहे;

Confusion about the plan | योजनेबाबत संभ्रम

योजनेबाबत संभ्रम

googlenewsNext

पाटोदा : दारिद्रय रेषेखालील व बेघर कुटुम्बांना निवारा देण्याच्या हेतूने असणारी ‘आवास’ योजना बंद करण्यात आली आहे. नव्याने ‘प्रधानमंत्री आवास’ योजना घोषित करण्यात आली आहे; मात्र या योजनेसाठीचे नियम, अटींचे निर्देश पंचायत समिती स्तरापर्यंत अद्याप पोचले नसल्याने याबाबत संभ्रमावस्था आहे. जि प निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गटातटात वाद निर्माण होत आहेत .
दारिद्र्यरेषेअंतर्गत व इतर बेघर कुटुंबांना स्वत:चे हक्कांचे छत देण्याचा भाग म्हणून इंदिरा आवास योजना, राजीव गांधी आवास योजना आणि रमाई आवास योजना अशा तीन योजना २०१५-१६ पर्यंत चालू आहेत. या योजना केंद्र सरकारच्या निधीमधून राबवल्या जातात. शासकीय पाहणी अहवालानुसार गुणानुक्रमानुसार प्राधान्य देण्यात आले. या पद्धतीने प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली .
गावपातळीवर राजकारण
दारिद्र्यरेषेअंतर्गत येणाऱ्या कुटुम्बांची प्रतीक्षा यादी संपुष्टात आलेली आहे . नवीन यादी तयार करण्याचे काम चालू आहे . अशा स्थितीत गावपातळीवरील पुढारी राजकीय स्वार्थासाठी वेगवेगळी माहिती सांगून जि प निवडणुकीचा ‘तवा’ गरम ठेवला जातो आहे .
घरकुलासंदर्भात आमच्याकडे स्पष्ट निर्देश आलेले नाहीत . त्यामुळे योजना कशी असेल याबाबत प्रशासन संभ्रमात आहे. सध्यातरी नवीन घरकुलासंदर्भात कुठलेही आदेश आले नसल्याचे गटविकास अधिकारी चंद्रशेखर केकान म्हणाले. (वार्ताहर)

Web Title: Confusion about the plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.