एक पेपर औरंगाबादला, दुसरा अहमदनगरला; भरती परीक्षेच्या नियोजनातील गोंधळ अजूनही सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 05:40 AM2021-10-17T05:40:44+5:302021-10-17T05:41:48+5:30

अनेकांना एका पदाच्या परीक्षेसाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील केंद्र देण्यात आली आहेत. त्यामुळे उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. 

confusion in the planning of recruitment exams of health department still continues | एक पेपर औरंगाबादला, दुसरा अहमदनगरला; भरती परीक्षेच्या नियोजनातील गोंधळ अजूनही सुरूच

एक पेपर औरंगाबादला, दुसरा अहमदनगरला; भरती परीक्षेच्या नियोजनातील गोंधळ अजूनही सुरूच

googlenewsNext

औरंगाबाद : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गातील भरतीच्या परीक्षेच्या नियोजनातील गोंधळ अजूनही सुरूच आहे. विविध पदांसाठी २४ आणि ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. यात वेगवेगळ्या पदांसाठी उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. मात्र, विविध संवर्गाची परीक्षा एकाच दिवशी, एकाच वेळेत ठेवण्यात आली आहे. शिवाय अनेकांना एका पदाच्या परीक्षेसाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील केंद्र देण्यात आली आहेत. त्यामुळे उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. 

पूर्वी गट - क आणि गट - ड संवर्गातील पद भरतीसाठी २५ आणि २६ सप्टेंबरला परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु परीक्षेच्या एक दिवस अगोदर गोंधळामुळे परीक्षा एक महिना पुढे ढकलण्यात आली.

वेगवेगळ्या पदांची परीक्षाही एकाच वेळेत आली आहे. त्यामुळे दोन पदांसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांना एका परीक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे. यात काहींना दोन वेगवेगळ्या जिल्ह्यातील केंद्र देण्यात आले आहेत. 

आरोग्य विभागात गोंधळ 
एका उमेदवाराला गृहवस्त्रपाल-वस्त्रपाल पदाच्या परीक्षेसाठी २४ ऑक्टोबरला औरंगाबादेतील खाराकुंवा केंद्र देण्यात आले 
आहे. तर त्यालाच सांख्यिकी अन्वेषक पदासाठी अहमदनगर केंद्र देण्यात आले आहे. एक परीक्षा सकाळी सकाळी १० ते दुपारी १२ तर दुसरी  त्याच दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत ही परीक्षा होणार आहे. 

Web Title: confusion in the planning of recruitment exams of health department still continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.