रांजणगावात मतदार याद्यात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:05 AM2021-01-02T04:05:42+5:302021-01-02T04:05:42+5:30

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील मतदार याद्यात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची ओरड मतदारातून होत आहे. येथील वार्ड क्रमांक ...

Confusion in the voter list in Ranjangaon | रांजणगावात मतदार याद्यात घोळ

रांजणगावात मतदार याद्यात घोळ

googlenewsNext

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील मतदार याद्यात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची ओरड मतदारातून होत आहे. येथील वार्ड क्रमांक ५ व ६ मधील एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या वार्डात समाविष्ट करण्यात आल्यामुळे मतदारात संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. आता निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने मतदार याद्यात बदल होण्याची शक्यता धूसर बनल्याने मतदारात नाराजीचा सूर आहे. मतदार याद्यात घोळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी देविदास सुतारल, सुनील कदम, विठ्ठल राठोड, नितीन खेमले आदींनी केली आहे.

वाळूजला फुटपाथ गायब

वाळूज महानगर : वाळूजला फुटपाथवर विविध व्यवसायिकांनी अतिक्रमणे केल्यामुळे पादचारी व नागरिकांना जीव धोक्यात घालून मुख्य रस्त्यावरुन ये-जा करावी लागत आहे. येथील लांझी टी पॉईंट ते लायननगर फुटपाथवर अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण करुन कब्जा केला आहे. व्यावसायिकांनी फुटपाथवरील लोखंडी संरक्षक खांब तोडून टाकले असून या मोकळ्या जागेवर दुकानातील साहित्य ठेवले जात आहे. परिणामी नागरिकांना जीव मुठीत धरुन मुख्य रस्त्यावरुन ये-जा करावी लागत आहे.

वडगाव रस्त्यावर अंधार

वाळूज महानगर : वडगाव-सिडको-तिसगाव रस्त्यावरील पथदिवे बंद असल्यामुळे नागरिक व वाहनधारकांना अंधारातून ये-जा करावी लागत आहे. या रस्त्यावरील पथदिवे बंद पडले असून दुरुस्तीकडे प्रशासन डोळेझाक करीत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. शहर व औद्योगिक क्षेत्रात ये-जा करण्यासाठी बहुतांश कामगार व नागरिक या रस्त्याचा वापर करतात. मात्र पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधारात चाचपडत ये-जा करावी लागत आहे. या रस्त्यावरील पथदिवे सुरु करण्याची मागणी अमोल साठे, शुभम शिरसाठ, लोकेश शेळके आदींनी केली आहे.

महावीर चौकात पडले खड्डे

वाळूज महानगर : पंढरपूर-बजाजनगर रस्त्यावरील महावीर चौकात खड्डे पडल्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. पंढरपुरातून बजाजनगरकडे वळण घेत असताना रस्त्यावरील खड्ड्यांत वाहने आदळत असतात. या खड्ड्यांमुळे अपघाताच्या संख्येतही वाढ झाली असून खड्ड्यांत आदळून वाहनांचे नुकसान होत आहे. या मुख्य चौकातील खड्डे बुजवून वाहनधारकांची गैरसोय थांबविण्याची मागणी राजेंद्र तिडके, गोरख दवणे, सुनील शिंदे यांनी केली आहे.

Web Title: Confusion in the voter list in Ranjangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.