सातारा परिसरात भर पावसाळ्यात पाण्याचा ठणठणाट; चिखलामुळे टँकरही येईनात

By साहेबराव हिवराळे | Published: August 11, 2023 06:43 PM2023-08-11T18:43:06+5:302023-08-11T18:43:31+5:30

रस्ता सुरळीत नसल्याने सातारा पाणीपुरवठ्याच्या विहिरीत टाकण्यात येणारे टँकर चिखलात रुतून बसते.

Congestion of water during monsoon in Satara area; Tankers will also come due to mud | सातारा परिसरात भर पावसाळ्यात पाण्याचा ठणठणाट; चिखलामुळे टँकरही येईनात

सातारा परिसरात भर पावसाळ्यात पाण्याचा ठणठणाट; चिखलामुळे टँकरही येईनात

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : सातारा गावातील पाणीपुरवठा विहिरीत भर पावसाळ्यातही पावसाअभावी मनपाच्या वतीने टँकर लावून पाणीपुरवठा करण्यात येत आहे; परंतु टँकर चिखलात रुतल्याने तो विहिरीपर्यंत घेऊन जाण्यासाठी चालक व पाणीपुरवठा करणाऱ्या लाइनमनला कठीण जात आहे. विहिरीला पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीटंचाई कायम आहे.

रस्ता थोडा चढाचा व चिखलामुळे खराब झाला आहे, टँकर त्या ठिकाणी फसते. त्यामुळे पंधरा दिवसांपासून टँकर येणे बंद झाले. टँकर येत नसल्याने विहिरीत पाणी नाही. महापालिकेने या ठिकाणी खडी टाकून हा रस्ता नीट केल्यास टँकरने पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे विनोद सोळणर, आकाश गढवे, गणेश साबळे, गिरीश पवार, शेख ईसाक, राम काळे, आदी नागरिकांचे म्हणणे आहे.
 

 

Web Title: Congestion of water during monsoon in Satara area; Tankers will also come due to mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.