धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अभिवादनासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 12:23 AM2017-10-01T00:23:14+5:302017-10-01T00:23:14+5:30

शहर तसेच जिल्हाभरात धम्मचक्र प्रवर्तन दिन अर्थात अशोक विजयादशमी उत्साहात साजरी करण्यात आली. भीमघाट व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादन सोहळा पार पडला.

Congregation for the festivities | धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अभिवादनासाठी गर्दी

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अभिवादनासाठी गर्दी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहर तसेच जिल्हाभरात धम्मचक्र प्रवर्तन दिन अर्थात अशोक विजयादशमी उत्साहात साजरी करण्यात आली. भीमघाट व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादन सोहळा पार पडला.
नागपूर येथे १४ आॅक्टोबर १९५६ मध्ये विजयादशमी दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा दिली. तेव्हापासून हा दिन धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जिल्ह्यातील बुद्ध विहारात पंचशील ध्वजारोहण, बुद्धवंदना, पूजापाठ तसेच विविध उपक्रम राबविले जातात.
शहरातील भीमघाट येथे शनिवारी सकाळी जी.एम. वाघमारे यांच्या हस्ते भिक्खू संघाच्या उपस्थितीत पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नाशिकचे केंद्रीय शिक्षक अ‍ॅड. शहाजी वानखेडे, पी. आर. धुळे यांच्यासह धम्म उपासकांची उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंबेडकर अनुयायांनी अभिवादनासाठी गर्दी केली होती. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष वि. वा. एंगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर प्रभाकर नांदेडकर यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांना २२ प्रतिज्ञा देण्यात आल्या. यावेळी रविकिरण जोंधळे, युवराज वाघमारे, राजपाल चिखलीकर, संबोधी सोनकांबळे, अ‍ॅड. मंगेश वाघमारे, रेखाताई पंडित, लताताई शिंदे, पार्वती जोंधळे, माधवराव सरपे आदींची उपस्थिती होती.
जिल्हाभरात बौद्ध विहारांमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातील नागसेननगर येथे १ आॅक्टोबर रोजी रक्तदान शिबीर तसेच मोफत सर्वरोग निदान शिबीर होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हे शिबीर होईल.

Web Title: Congregation for the festivities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.