कॉंग्रेसने संसदेतील चर्चेतून पळ काढला; रावसाहेब दानवे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 01:23 PM2018-04-12T13:23:47+5:302018-04-12T13:26:25+5:30

संसदेत महत्वपूर्ण अशा अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॉंग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांनी गोंधळ घालत कामकाज बंद पडले. यासोबतच सरकार विरोधी पक्षांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार असतानाही त्यांनी चर्चेतून पळ काढला अशी जोरदार टीका भाजप प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आज येथे केली. 

Congress escapes Parliament's debate;Raosaheb Danwe smashes congress | कॉंग्रेसने संसदेतील चर्चेतून पळ काढला; रावसाहेब दानवे यांची टीका

कॉंग्रेसने संसदेतील चर्चेतून पळ काढला; रावसाहेब दानवे यांची टीका

googlenewsNext
ठळक मुद्देकॉंग्रेसमुळे संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे २३ दिवस कामकाजाविना वाया गेले असा आरोप करत भाजपने याच्या निषेधार्त देशभरात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन सुरु केले आहे.

औरंगाबाद : संसदेत महत्वपूर्ण अशा अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॉंग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांनी गोंधळ घालत कामकाज बंद पडले. यासोबतच सरकार विरोधी पक्षांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार असतानाही त्यांनी चर्चेतून पळ काढला अशी जोरदार टीका भाजप प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आज येथे केली. 

कॉंग्रेसमुळे संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे २३ दिवस कामकाजाविना वाया गेले असा आरोप करत भाजपने याच्या निषेधार्त देशभरात आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन सुरु केले आहे.  यानुसार गुलमंडी येथील आंदोलनात खासदार रावसाहेब दानवे सहभागी झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, संसदेत अर्थसंकल्पीय विषयावर महत्वपूर्ण अधिवेशन कॉंग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांनी गोंधळ घालत वाया घातले. २३ दिवसात कसलेही कामकाज न झाल्याने सरकारचा पैसा व वेळ वाया गेला. सरकार त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार असतानाही त्यांनी चर्चेतून पळ काढला. कॉंग्रेसची ही भूमिका लोकशाही विरोधी आहे. याचा निषेध म्हणून आज भाजप खासदार देशभरात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहेत.

खासदार मानधन घेणार नाहीत 
यासोबतच संसेदेचे वाया गेलेल्या दिवसाचे मानधन भाजप खासदार घेणार नाहीत,ते मानधन सरकारला परत करण्यात येईल असेही खासदार दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Web Title: Congress escapes Parliament's debate;Raosaheb Danwe smashes congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.