मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसचा ग्राऊंड सर्व्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:02 AM2021-02-16T04:02:56+5:302021-02-16T04:02:56+5:30
लातूर जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी बैठकीत मागणी केल्याचे सांगत देशमुख म्हणाले, मागील वर्ष कोरोना महामारीत गेले. ...
लातूर जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी बैठकीत मागणी केल्याचे सांगत देशमुख म्हणाले, मागील वर्ष कोरोना महामारीत गेले. त्यामुळे यंदा राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण यासाठी ७ टक्क्यांची तरतूद करावी, अशी मागणी अर्थमंत्र्यांकडे केली आहे. गतवर्षी ही तरतूद ४ टक्के एवढी होती, असेही ते म्हणाले.
ही बैठक म्हणजे निव्वळ धूळफेक
औरंगाबाद : लातूरचे आ.संभाजी निलंगेकर यांनी जिल्हानिहाय बैठक म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप केला. अर्ध्या तासात एका जिल्ह्यातील कामांचा आणि तरतुदीचा आढावा कसा घेणार. त्यातच बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देखील बोलण्याची मुभा नव्हती. नावाला बैठक घेतली गेली. कोणताही विषय आला तर केंद्रकड़े बोट दाखवून सगळे मोकळे झाले. लातूर, उस्मानाबाद, बीड पाणी प्रश्न तरतूदीवर काही बोलू दिले नाही. शेतकरी अनुदान, वीज जोडणीचा विषय काढला तर या भागात मोठी थकबाकी असल्याचे सांगून विषय टाळला. बारामती जिल्ह्यात जेवढा निधी जाणार तेवढा मराठवड्यात प्रत्येक विभागात मिळावा, अशी अपेक्षा निलंगेकर यांनी व्यक्त केली.