काँग्रेसने काढला ‘विधानसभे’चा वचपा

By Admin | Published: April 6, 2016 12:17 AM2016-04-06T00:17:23+5:302016-04-07T00:25:22+5:30

गोविंद इंगळे , निलंगा निलंगा विधानसभा व औराद बाजार समितीच्या निवडणूकीत दोन वेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसचे अशोकराव पाटील निलंगेकर

Congress has adopted the Legislative Assembly elections | काँग्रेसने काढला ‘विधानसभे’चा वचपा

काँग्रेसने काढला ‘विधानसभे’चा वचपा

googlenewsNext


गोविंद इंगळे , निलंगा
निलंगा विधानसभा व औराद बाजार समितीच्या निवडणूकीत दोन वेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसचे अशोकराव पाटील निलंगेकर यांनी पुतण्या आ़संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विरोधात शिस्तबध्द नियोजन केले़ त्यामुळेच निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीवर दणदणीत विजय मिळवून त्यांनी दोन वेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढत बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकावला़
विधानसभा निवडणुकीत पराभव पत्कारलेल्या अशोकरावांना औराद कृषी उत्पन्न बाजारसमितीवर वर्चस्व निर्माण करता आले नाही़ सलग दोनवेळा अपयश आल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मरगळ आली होती़ म्हणून केवळ कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अशोकरावांनी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला़ दरम्यान विरोधकांची टिकेची झोड सुरु झाली़ विधानसभा, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद असा प्रवास करीत अशोकरावांनी कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडणूक लढवून सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय केला़ तर केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ८ एकर जमिनीवर डोळा ठेवून निवडणूक लढवित असल्याचा आरोप पुतण्या आ़संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला़ खुद्द अशोकराव पाटील निलंगेकर हे निवडणूकीच्या रिंगणात असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह होता़ विरोधकांच्या टिकेला न जुमानता अशोकरावांनी विजयी घोडदौड सुरु केली़ आ़बसवराज पाटील मुरुमकर हेही विधानसभेत केलेल्या मदतीची उत्तराई करत अशोकरावांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले़ व निलंगा तालुक्यातील ६४ गावांतील मतदारांची उमरगा येथे बैठक घेऊन विजयाचा विडा उचलूनच बाहेर पडले़ माजी मुख्यमंत्री डॉ़शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा बैठकीत आवाहन केले होते़ तरीही विधानसभा व औराद बाजारसमितीच्या निवडणूकीत झालेल्या चुकीची दुरुस्ती करत अशोकरावांनी व्युव्हरचना करीत मोर्चेबांधणी केली़ गृहभेटी, प्रत्यक्ष कॉर्नर बैठका आवश्यक ठिकाणी सभा लाऊन स्वत: लक्ष देऊन विजयश्री खेचून आणला़ या विजयामुळे काँगे्रस कार्यकर्त्यांत आता नवचैतन्य आले असून भविष्यातील अपेक्षा निश्चितच वाढल्या आहेत़
शिवसेनेचे लिंबन महाराज रेशमे व अविनाश रेशमे यांनी उमदेवार उभे केले़ मात्र, अभय साळुंके, शिवाजी माने, ईश्वर पाटील, शेषेराव ममाळे यांना विश्वासात न घेतल्याने पराभवाला सामोरे जावे लागले़

Web Title: Congress has adopted the Legislative Assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.