औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांवर का संतापले काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 11:33 PM2018-10-08T23:33:12+5:302018-10-08T23:34:21+5:30
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काँग्रेसच्या मोर्चाचे नेतृत्व करणारे आ.अब्दुल सत्तार व शिष्टमंडळाला ताटकळत ठेवल्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला. विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना भेटू नये, असा सरकारचा प्रशासनाला आदेश आहे की काय? असा संतप्त सवालही सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना केला.
औरंगाबाद : जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काँग्रेसच्या मोर्चाचे नेतृत्व करणारे आ.अब्दुल सत्तार व शिष्टमंडळाला ताटकळत ठेवल्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला. विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना भेटू नये, असा सरकारचा प्रशासनाला आदेश आहे की काय? असा संतप्त सवालही सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना केला.
निरपराधांवर होणाºया पोलीस अत्याचारांविरोधात काँग्रेसने सोमवारी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्या मोर्चाचे निवेदन देण्यासाठी आ. सत्तार यांच्यासह आ. सुभाष झांबड, माजी आ. डॉ. कल्याण काळे, नामदेव पवार, नितीन पाटील आदी पदाधिकारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यासाठी दुपारच्या सुमारास जिल्हाधिकाºयांना भेटण्यासाठी गेले होते. एका बैठकीत असल्याचे सांगून जिल्हाधिकाºयांनी त्या शिष्टमंडळाला ताटकळत ठेवले. जिल्हाधिकाºयांनी तातडीने निवेदन स्वीकारावे, अशी भूमिका काँग्रेस पदाधिकाºयांनी घेतली. लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप सत्तार यांनी करण्यास सुरुवात करताच जिल्हाधिकारी चौधरी आले, मात्र शिष्टमंडळात कॅमेरामन व इतर माध्यम प्रतिनिधींना पाहून ते भडकले निवेदन देतानाचे छायाचित्र काढण्यास जिल्हाधिकाºयांनी विरोध केल्याचा आरोप सत्तार यांनी केला.
जिल्हाधिकाºयांनी आम्हाला ताटकळत ठेवले भेट दिली नाही. लोकप्रतिनिधींना योग्य मान सन्मान देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घ्या, असा सरकारचा अध्यादेश आहे. जिल्हाधिकाºयांना त्याचा विसर पडला की काय,असा सवाल सत्तार व पदाधिकाºयांनी केला.
जिल्हाधिकारी म्हणाले
जिल्हाधिकारी चौधरी यांनी सांगितले, असे काही घडले नाही. मी शेजारच्या दालनात बैठकीत होतो. कुणाचाही अपमान केला नाही. लोकप्रतिनिधी येणार असल्याची पूर्वसूचना मिळाली नव्हती. ते येणार असल्याची माहिती मिळताच त्यांना दालनात बसण्याचा निरोप दिला होता. दरम्यान काही क्षणातच दालनाबाहेर गदारोळ सुरू झाल्याचे कानावर आले.
तीन वर्षांपूर्वी असेच घडले होते
तीन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंग यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निवेदन बसून स्वीकारले होते. लोकप्रतिनिधींचा अवमान झाल्याचा आरोप त्यावेळी काँगे्रसच्या गोटातून करण्यात आला होता. त्या घटनेनंतर आठवड्यातच जिल्हाधिकाºयांची बदली झाली होती.