दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे पेट्रोलपंपांवर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:04 AM2021-06-09T04:04:11+5:302021-06-09T04:04:11+5:30
औरंगाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीने औरंगाबादेत राज पेट्रोलपंपावर हे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या हातात महागाईचा भस्मासुर म्हणून नरेंद्र ...
औरंगाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीने औरंगाबादेत राज पेट्रोलपंपावर हे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या हातात महागाईचा भस्मासुर म्हणून नरेंद्र मोदी यांना चित्रित करण्यात आलेले फलक होते.
पेट्रोल, डिझेलची दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, केंद्र सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय, आपल्या देशातील लस परदेशी पाठवणाऱ्या सरकारचा निषेध असो, अशा घोषणांनी पेट्रोलपंप परिसर दणाणून सोडण्यात आला होता.
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. प्रदेश सरचिटणीस रवींद्र काळे, जिल्हा उपाध्यक्ष किरण पा. डोणगावकर, तालुकाध्यक्ष रामूकाका शेळके, भाऊसाहेब जगताप, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सरोज मसलगे, दीपाली मिसाळ, राहुल सावंत, संजय जगताप, सर्जेराव चव्हाण, आतिष पितळे, मोहित जाधव, सचिन शिरसाट, अनुराग शिंदे, अशोक डोळस, गौरव जैस्वाल, पप्पूराज ठुबे, प्रकाश सानप, मुसा पटेल, अंकुश चौधरी, सुभाष पांडभरे, मोसीन खान, मजहर पटेल, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष जयप्रकाश नारनवरे, नदीम शेख, हबीब शेख, बबन जगताप, श्याम गावंडे, विठ्ठल कोरडे, संतोष शेजूळ, अर्जुन शेळके, सुरेश शिंदे, विजय जाधव, बाबासाहेब बोरचाटे, शुभम साळवे, संदीप मनोहर आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.
शहर कॉंग्रेसतर्फे चुनिलाल पेट्रोलपंपावर निदर्शने करण्यात आली. क्रांती चौक पेट्रोलपंपावरही असेच आंदोलन करून लोकांचे लक्ष वेधण्यात आले.