राहुल गांधी यांच्या सभेची काँग्रेसकडून जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:07 AM2017-09-08T00:07:56+5:302017-09-08T00:07:56+5:30
अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खा़ राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी होणाºया संघर्ष सभेसाठी परभणी शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य मंडप टाकण्यात आला आहे़ सुमारे ४० हजार नागरिकांची आसन व्यवस्था येथे करण्यात आली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खा़ राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी होणाºया संघर्ष सभेसाठी परभणी शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य मंडप टाकण्यात आला आहे़ सुमारे ४० हजार नागरिकांची आसन व्यवस्था येथे करण्यात आली आहे़
खा़ राहुल गांधी यांचा परभणी दौरा निश्चित झाल्यानंतर जिल्हा काँग्रेसच्या वतीने मागील १५ दिवसांपासून या दौºयाची तयारी सुरू करण्यात आली होती. जिंतूर रोडवरील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी ३ वाजता खा़ राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ही संघर्ष सभा होणार आहे़ यासाठी ५०० बाय २०५ फुटाचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे़ १७ हजार ५०० खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली असून, १५ हजार नागरिक बसतील, अशी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे़ त्याच प्रमाणे ३० बाय ४८ फुटाचा मुख्य मंच उभारण्यात आला असून, या मंचावर प्रमुख पाहुण्यांसाठी ४५ खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे़ प्रत्येकाला खा़ राहुल गांधी यांचे भाषण ऐकता यावे, यासाठी या भव्य मंडपात सहा मोठे एलईडी उभारण्यात आले आहेत़ मंडपात प्रवेशासाठी देखील नियोजनबद्ध सुविधा करण्यात आल्या आहेत़
तीन व्हीआयपी गेट करण्यात आले असून, इतरांसाठी दोन गेटची व्यवस्था केली आहे़ महिलांसाठी स्वतंत्र सुविधा असेल़ प्रत्येक नागरिकांची बायोमॅट्रिक तपासणी करूनच सभामंडपात प्रवेश दिला जाणार आहे़ गुरुवारी सकाळपासूनच कार्यकर्ते सभास्थळी नियोजनामध्ये गुंतले होते़
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, मनपातील सभागृह नेते भगवान वाघमारे, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे, बंडू पाचलिंग आदींनी सायंकाळच्या सुमारास सभामंडपाची पाहणी केली़ सावली विश्रामगृह ते जिंतूर रोडवरील नूतन महाविद्यालयापर्यंतच्या संपूर्ण परिसरात पोलीस प्रशासनाने तपासणी केली आहे़ तसेच सभास्थळी सकाळपासून विविध भागात तपासणीचे काम करण्यात आले़ सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाय करण्यात आले आहेत़ शुक्रवारी सावली विश्रामगृह ते जिंतूर रोड या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, या दृष्टीनेही स्थानिक पोलिस प्रशासनाने नियोजन केले आहे़ ठिक ठिकाणी वाहतूक कर्मचाºयांचे पॉर्इंट निश्चित करण्यात आले आहेत़