नियोजन समितीवर काँग्रेसचाच दबदबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:42 AM2017-09-29T00:42:45+5:302017-09-29T00:42:45+5:30
जिल्हा नियोजन समितीच्या ३५ जागांसाठी झालेल्या लढतीत काँग्रेसला सर्वाधिक १७ तर त्या खालोखाल भाजपाला ७, शिवसेनेला ५ आणि राष्ट्रवादीला ३ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस पुरस्कृत रासपचा एक, भाजपचा एक आणि अपक्ष एक तीन उमेदवारही नियोजन समितीवर गेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचाच वरचष्मा राहिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्हा नियोजन समितीच्या ३५ जागांसाठी झालेल्या लढतीत काँग्रेसला सर्वाधिक १७ तर त्या खालोखाल भाजपाला ७, शिवसेनेला ५ आणि राष्ट्रवादीला ३ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस पुरस्कृत रासपचा एक, भाजपचा एक आणि अपक्ष एक तीन उमेदवारही नियोजन समितीवर गेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचाच वरचष्मा राहिला आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या ३५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १८ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या तर बुधवारी उर्वरीत १७ जागांसाठी मतदान घेण्यात आले. त्याचा गुरुवारी निकाल हाती आला. त्यात जिल्हा परिषद निर्वाचन क्षेत्रातून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून काँग्रेसच्या प्रणिता दिलीप बंदखडके, अंकिता कैलास देशमुख, सर्वसाधारण प्रवर्गातून प्रकाशराव भगवानराव कल्याणकर, मनोहर गणेशराव शिंदे हे निवडून आले. लहान निर्वाचन गटात मात्र काँग्रेसला एकच जागा मिळाली आहे. वैशाली रावसाहेब चौदंते यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून विजय मिळवला. नागरिकांचा मागास प्रवर्गातून भाजपाचे चंद्रकांत गरुडकर आणि सर्वसाधारण प्रवर्गातून भाजपाचेच विठ्ठल चिनन्ना कुडमुलवार आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गातून दिपाली अशोक मामीडवार या राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी झाल्या.
महापालिका गटातही काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. नागरिकांचा मागास प्रवर्गातून अब्दुल लतिफ अब्दुल माजिद आणि उमेश चव्हाण यांनी एकतर्फी विजय मिळविला. सेनेचे प्रविण प्रतापराव चिखलीकर हेही या निवडणुकीत गुरुवारी विजयी झाले आहेत.
या निवडणुकीत १८ उमेदवार निवडून आले. त्यामध्ये काँग्रेसचे केरबा चिमाजी सूर्यवंशी, संगीता सुनील अटकोरे, अरुणा मधुकर सरोदे, मंगाराणी सुरेश अंबुलगेकर, सुशिलाबाई हनमंतराव पाटील, रामराव तुळशीराम नाईक, संजय माधवराव बेळगे आणि नगर परिषद गटातून जयश्री ब्रह्मानंद कल्याणे यांनी विजय मिळवला आहे तर सेनेचे मारोती चोखाजी लोखंडे, रासपाचे दशरथ मंगाजी लोहबंदे, सेनेच्या भाग्यश्री विक्रम साबणे, बबन रामराव बारसे, भाजपाचे माणिकराव पुंडलिक लोहगावे, संध्याताई मुक्तेश्वर धोेंडगे, भाजपाच्या गंगासागर विजय पाटील, डॉ. मिनल निरंजन खतगावकर यांचा समावेश आहे.