भाजप विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 12:27 AM2017-11-09T00:27:59+5:302017-11-09T00:27:59+5:30
सत्तेवर येऊन तीन वर्षे झाल्यानंतरही भाजप सरकारने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही़़ राज्यातही हिच परिस्थिती आहे़ सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असून, या सरकार विरुद्ध जनआक्रोश सप्ताह पाळला जात आहे़ या अंतर्गत बुधवारी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सत्तेवर येऊन तीन वर्षे झाल्यानंतरही भाजप सरकारने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही़़ राज्यातही हिच परिस्थिती आहे़ सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असून, या सरकार विरुद्ध जनआक्रोश सप्ताह पाळला जात आहे़ या अंतर्गत बुधवारी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले़
सत्ता आल्यानंतर राज्यात एकाही शेतकºयाची आत्महत्या होऊ देणार नाही, कोरडवाहू शेतीत ठिबक सिंचनासाठी ९० टक्के अनुदान देऊ, प्रत्येक शेतकºयाच्या शेतात वीज, पाणी देऊ, शेतमालाला ५० टक्के नफा मिळेल, अशी व्यवस्था करू, आदी आश्वासने भाजपाने निवडणुकीपूर्वी दिली होती़ मात्र तीन वर्षांचा कालखंड उलटूनही या आश्वासनांची पूर्तता झाली नाही़ राज्यात १२ हजारांपेक्षा अधिक शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत़ जीएसटीमुळे शेती आवजारांच्या किंमती वाढल्या़ शेतकºयांना ५० टक्के नफा तर सोडाच परंतु, हमीभावही मिळत नाही़
या सर्व पार्श्वभूमीवर सरकार अपयशी ठरले असून, या सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी बुधवारी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांच्यासह शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, माजी खा़ तुकाराम रेंगे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे, इरफानूर रहेमान, रवि सोनकांबळे, जयश्रीताई खोबे, अब्दुल सईद, बाळासाहेब देशमुख, नगरसेवक सुनील देशमुख, सचिन देशमुख, अमानउल्ला खान, सालेह चाऊस, पंजाबराव देशमुख, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष नागसेन भेरजे, बंडू पाचलिंग, अॅड़ हनुमंत जाधव, सचिन जवंजाळ, सुरेश काळे, अतिक उर रहेमान, सुहास पंडीत, मलेका गफार, जानूबी, पठाण दुर्राणी खानम, वंदना पवार, जयश्री जाधव, रत्नमाला शिंगणकर, इरफान मलीक, मिनहाज कादरी आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते़