समांतर जलवाहिनीचे आज कापणार कनेक्शन?
By Admin | Published: June 30, 2016 01:04 AM2016-06-30T01:04:59+5:302016-06-30T01:29:18+5:30
औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीचा गाशा गुरुवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत गुंडाळण्यात येणार आहे.
औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीचा गाशा गुरुवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत गुंडाळण्यात येणार आहे. सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीसह सर्वच पक्षांनी मनपा प्रशासनाने सादर केलेल्या ठरावाच्या बाजूने मत तयार केले आहे. सर्वसाधारण सभेत समांतरच्या कंत्राटदाराच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात येणार आहे.
बुधवारी पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, आ. इम्तियाज जलील, महापौर त्र्यंबक तुपे, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांची प्रमुख उपस्थिती (पान २ वर)
शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोट्यवधी रुपयांची कमाई कंपनी करीत आहे. दहा वर्षांनंतर शहरातील सर्वसामान्य नागरिकाला अर्धा इंच नळ कनेक्शनसाठी तब्बल २२ हजार रुपये दरवर्षी मोजावे लागतील. गुरुवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे सर्व नगरसेवक कंपनीचा गाशा गुंडाळण्यासाठी अग्रेसर राहतील, असे शहराध्यक्ष नामदेव पवार आणि गटनेते भाऊसाहेब जगताप यांनी कळविले.
भाजपच्या उस्मानपुरा येथील कार्यालयात बुधवारी रात्री बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कंपनीची त्वरित हकालपट्टी करावी, असा सर्वानुमते निर्णय यावेळी घेण्यात आला. नंतर फटाके फोडून जल्लोष करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, गटनेते बापू घडामोडे यांनी दिली.
पाणीपुरवठ्याचे खाजगीकरण करणे हीच मुळात गंभीर बाब आहे. महापालिकेने पाच वर्षांपूर्वी हा दुर्दैवी निर्णय घेतला. खाजगी कंपनी कोणत्या पद्धतीने काम करीत आहे, हे आतापर्यंत सर्वांनाच दिसून आले आहे.
४शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी हित लक्षात घेऊन कंपनीची त्वरित हकालपट्टी करावी. भविष्यात मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम कोणत्याही कंपनीकडून करण्यात येऊ नये.