नातेवाइकांची संमती; डाॅक्टरांचीही तयारी पूर्ण; मात्र ऐनवेळी वैद्यकीय अडचणीमुळे टळले अवयवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:05 AM2021-06-16T04:05:51+5:302021-06-16T04:05:51+5:30

जालना येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या मेंदूत अचानक रक्तस्राव झाल्याने त्या कोमात गेल्या होत्या. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात ...

Consent of relatives; Doctors are also ready; However, due to medical problems, organ donation was avoided | नातेवाइकांची संमती; डाॅक्टरांचीही तयारी पूर्ण; मात्र ऐनवेळी वैद्यकीय अडचणीमुळे टळले अवयवदान

नातेवाइकांची संमती; डाॅक्टरांचीही तयारी पूर्ण; मात्र ऐनवेळी वैद्यकीय अडचणीमुळे टळले अवयवदान

googlenewsNext

जालना येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या मेंदूत अचानक रक्तस्राव झाल्याने त्या कोमात गेल्या होत्या. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना डाॅक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केले होते. यावेळी नातेवाइकांना अवयव दानाविषयी माहिती देण्यात आली. गरजू रुग्णांना जीवदान मिळेल या भावनेने नातेवाइकांनी तत्काळ अवयवदानाला होकार भरला. त्याविषयी झोनल ट्रान्सप्लांट को ऑर्डिनेशन कमिटी (झेडटीसीसी) ला माहिती देण्यात आली. रविवारी दिवसभर अवयवदानाच्या विविध मान्यतेच्या प्रक्रिया पार पाडल्या गेल्या. दरम्यान, चेन्नई, मुंबई, दिल्ली येथे लिव्हर, किडनी देण्यासंबंधीची पडताळणी केली गेली.

या अवयवदानामुळे कोरोनाकाळात पहिलेच अवयवदान होईल, अशी आशा वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत होती. मात्र, अवयवदानापूर्वी काही वेळ आधीच महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे अवयवदान टळले. लिव्हर, किडनीसह इतर अवयव दान होणार होते. त्याविषयी सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, ते शक्य होऊ शकले नाही, अशी माहिती डाॅ. शरद बिरादार आणि झेडटीसीसीचे समन्वयक मनोज गाडेकर यांनी दिली.

Web Title: Consent of relatives; Doctors are also ready; However, due to medical problems, organ donation was avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.