अधिक रुग्णसंख्या असणाऱ्या जिल्ह्यांत कडक लॉकडाऊनचा विचार - टोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 04:37 AM2021-05-09T04:37:58+5:302021-05-09T04:38:03+5:30

पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले की, आजही महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ही ५० ते ६० हजारांच्या घरात आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी केवळ १२ जिल्ह्यांत कोरोनाचा आलेख काहीअंशी कमी झाला आहे.

Consideration of strict lockdown in districts with high patient population says rajesh tope | अधिक रुग्णसंख्या असणाऱ्या जिल्ह्यांत कडक लॉकडाऊनचा विचार - टोपे

अधिक रुग्णसंख्या असणाऱ्या जिल्ह्यांत कडक लॉकडाऊनचा विचार - टोपे

googlenewsNext

जालना : कोरोना रुग्णांची संख्या राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये कमी हाेत असल्याच्या सकारात्मक बातम्या येत आहेत. ही बाब चांगली आहे. मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणात नाही, तेथे कडक लॉकडाऊन लावण्याचा मुद्दा विचाराधीन असल्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिले. (Consideration of strict lockdown in districts with high patient population says rajesh tope)

पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले की, आजही महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ही ५० ते ६० हजारांच्या घरात आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी केवळ १२ जिल्ह्यांत कोरोनाचा आलेख काहीअंशी कमी झाला आहे. त्याामुळे त्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथिलतेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाेबत बैठक होऊन नंतरच तो निर्णय १५ मे रोजी घेतला जाणार आहे. 

रुग्णवाढ कमी होण्याचा मुद्दा अभ्यासला असता, केवळ एक तृतीयांश आलेख कमी झाला आहे, तर दुसरीकडे दोन तृतीयांश कोरोना आजही गंभीर स्थितीत असल्याने राज्याची चिंता कायम आहे. 

Web Title: Consideration of strict lockdown in districts with high patient population says rajesh tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.