लस वाढवून देण्याची सातत्याने मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:04 AM2021-07-24T04:04:06+5:302021-07-24T04:04:06+5:30
पत्रकारांशी संवाद साधताना पाण्डेय म्हणाले की, शासनाने अलीकडेच लोकसंख्येच्या निकषानुसार डोस उपलब्ध करून देण्याचे धोरण स्वीकारले आहे. शहरात ज्या ...
पत्रकारांशी संवाद साधताना पाण्डेय म्हणाले की, शासनाने अलीकडेच लोकसंख्येच्या निकषानुसार डोस उपलब्ध करून देण्याचे धोरण स्वीकारले आहे. शहरात ज्या पद्धतीने टंचाई भासत आहे, तशीच टंचाई ग्रामीण भागातही आहे. जिल्हा प्रशासनाकडे होणाऱ्या टास्क फोर्सच्या बैठकांमध्ये डोस वाढवून द्यावा, ही मागणी करण्यात आलेली आहे. चार ते पाच वेळेस आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडेही डोसची अधिक मागणी आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून झालेली आहे. शासनालाच माेठ्या प्रमाणात लस मिळत नाही. उशिराने का होईना दुसरा डोस मिळाला तरी काही हरकत नाही. नागरिकांनी विनाकारण घाबरण्याचे कारण नाही.
चौकट...
पहिला डोस ७०, दुसरा ९८ टक्के सुरक्षा देईल!
तिसरी लाट येण्यापूर्वी नागरिकांनी कोराना प्रतिबंध लसचा पहिला किंवा दुसरा डोस घेणे खूप गरजेचे आहे. पहिल्या डोसमुळे ७० टक्के तर दुसऱ्या डोसने ९८ टक्के सुरक्षितता मिळेल. केंद्र शासनाने केलेल्या सिरो सर्व्हेक्षणातील हा डेटा आहे. पहिला डोस घेतला असेल तरी शरीरात ॲन्टीबॉडीज तयार झालेल्या असतात. संबंधित व्यक्ती ७० टक्के सुरक्षित राहील, असे पाण्डेय म्हणाले.