१०० टक्के निकालाची सातत्यपूर्ण परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:07 AM2021-02-23T04:07:10+5:302021-02-23T04:07:10+5:30
प्रा. शेप सर मॅथ्स अकॅडमीच्या माध्यमातून मागील २५ वर्षांपेक्षाही अधिक काळापासून गणित अध्यापनाचे कार्य करत आहेत. ११ वी, १२ ...
प्रा. शेप सर मॅथ्स अकॅडमीच्या माध्यमातून मागील २५ वर्षांपेक्षाही अधिक काळापासून गणित अध्यापनाचे कार्य करत आहेत. ११ वी, १२ वी बोर्ड यासोबतच जेईई ॲडव्हान्स आणि मेन यासारख्या स्पर्धा परीक्षांसाठी गणिताचा पाया मजबूत करणारा आधारस्तंभ म्हणून शेप सरांची ओळख आहे. शिक्षण क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव असल्यानेच कोणत्या विद्यार्थ्याला कसे आणि किती समजून सांगायचे, त्याचे नेमके काय चुकतेय, अभ्यास कुठे कमी पडतोय, हे शेप सरांना अत्यंत अचूकतेने हेरता येते. त्याचीच परिणिती १०० टक्के निकालाच्या सातत्यपूर्ण परंपरेत झाली आहे.
चौकट :
लवकरच या बॅचेसला होणार सुरूवात
- दि. २५ फेब्रुवारीपासून सध्या १० वीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ११ वी फाउंडेशन बॅचची सुरूवात होणार आहे.
- जेईई- २०२२ या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची बॅच दि. १ मार्चपासून सुरू होत आहे.
- तसेच जेईई- २०२१ परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षेची तयारी आणि एमएचटीसीईटी, क्रॅश कोर्स या बॅचची सुरूवात दि. १ मार्चपासून होईल.
चौकट :
३ वर्षांपासून घवघवीत यश
- २०१८ यावर्षी शेप सरांच्या मार्गदर्शनाखाली जेईई परीक्षेत १५ पैकी १४ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले होते. तसेच २०१९ व २०२० या दोन्ही वर्षात प्रा. शेप यांचे सर्वच विद्यार्थी जेईई परीक्षेसाठी पात्र ठरले असून क्लासेसने १०० टक्के निकाल दिला आहे.
चौकट :
ऑनलाईन क्लासमध्येही प्रभावी मार्गदर्शन
कोरोनामुळे आता ऑनलाईन क्लास घेणे अपरिहार्यच झाले आहे. नव्या काळाच्या नव्या गरजा ओळखून शेप सरांनी ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन करण्यास सुरूवात केली आहे. ऑनलाईन क्लास असतानाही त्यांनी त्यांच्या क्लासेसमधील १५ ही विद्यार्थी संख्या कायम ठेवलेली आहे. यामुळे ऑनलाईन क्लासही अत्यंत शिस्तीत होतो आणि विद्यार्थ्यांकडे लक्ष देता येते, असे त्यांनी सांगितले. - त्यांच्या कोणत्याही ऑनलाईन लेक्चरचे रेकॉर्डिंग करणे शेप सर कटाक्षाने टाळतात. यामागे एकच उद्देश आहे आणि तो म्हणजे विद्यार्थ्यांची क्लासेसमधील उपस्थिती १०० टक्के असणे. याविषयी सांगताना शेप सर म्हणाले की, जेव्हा एखाद्या लेक्चरचे रेकॉर्डिंग आपल्याला मिळणार आहे, हे समजले की विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होत जाते आणि नंतर रेकॉर्डिंग पाहून विषय समजून घेऊ, ही भावना वाढीस लागते. यामुळे मग अनेक विद्यार्थी क्लासमध्ये १०० टक्के एकाग्रता ठेवत नाहीत. त्यामुळे लेक्चरचे रेकॉर्डिंग करणे शेप सर कटाक्षाने टाळत आहेत.
चौकट :
- नामवंत प्राध्यापकांचे मार्गदर्शन
कोरोनाच्या आधी ऑफलाईन क्लासेस सुरू असतानाही भारतातील नामवंत प्राध्यापकांचे मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी शेप सर कायमच प्रयत्नशील असायचे. त्यामुळे आता तर ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून एक मोठे व्यासपीठच या उपक्रमासाठी लाभले असून आताही भारतातील नामवंत तज्ञ शेप सरांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतात आणि मार्गदर्शन करतात. याचा खूप उपयोग होतो असे सरांच्या काही माजी विद्यार्थ्यांनी आवर्जून नमूद केले.
- माजी विद्यार्थ्यांशी संवाद-
आयआयटी, जेईई परीक्षा उत्तीर्ण झालेले शेप सरांचे माजी विद्यार्थी देखील नेहमीच सध्या क्लासमध्ये
असणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव सांगतात. त्यांची अभ्यासाची तयारी, ऐन वेळी परीक्षेत होऊ पाहणारा गोंधळ आणि तो टाळायचा कसा याचे कसब हे अनुभवाचे बोल विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरतात.
चौकट :
अशी होते विद्यार्थ्यांची निवड
एका क्लासमध्ये केवळ १५ विद्यार्थी हे शेप सरांच्या क्लासचे वैशिष्ट्य आहे. या १५ विद्यार्थ्यांची निवड ते कधीच कोणती परीक्षा घेऊन करत नाहीत. त्यांच्य क्लासमध्ये सुरूवातीचे ३ ते ४ दिवस विद्यार्थ्यांना मोफ त शिकविले जाते. यामध्ये कोणता विद्यार्थी किती हुशार आहे, हे पाहण्यापेक्षा कोणत्या विद्यार्थ्याची मेहनत करण्याची तयारी आहे, यावर ते जास्त भर देतात आणि अशाच विद्यार्थ्यांना त्यांच्या क्लासमध्ये प्रवेश देतात. त्यामुळेच मेहनती विद्यार्थ्यांसाठी शेप सरांचे मॅथ्स क्लासेस हा सर्वोत्तम पर्याय आहे.
चौकट :
संपर्क
शेप सरांचे प्लस मॅथेमॅटिक्स
आयआयटी सेंंटर, जेईई मेन्स ॲण्ड ॲडव्हान्स,
गोपाल कल्चरल हॉलच्या उजव्या बाजूला, उस्मानपुरा.
संपर्क- ९४०३१२३१२२, ९४०४१३७६७७