शहरात बांधकाम ठेकेदाराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 11:02 PM2019-07-07T23:02:33+5:302019-07-07T23:03:59+5:30
बांधकाम ठेकेदार गोपाळकृष्ण शामराव सातारकर (७५,रा. सातारकरनगर, सातारा) यांनी शनिवारी रात्री आत्महत्या केली.
औरंगाबाद : बांधकाम ठेकेदार गोपाळकृष्ण शामराव सातारकर (७५,रा. सातारकरनगर, सातारा) यांनी शनिवारी रात्री आत्महत्या केली.
कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या केल्याचे समजते. शहरातील काही नागरिकांकडून सातारकर व त्यांच्या मुलाने घराचे बांधकाम करून देतो म्हणून पैसे घेतले होते. मात्र, त्यांनी घर बांधून दिले नाही व घेतलेली रक्कमही परत दिली नाही. त्यामुळे घेतलेले पैसे परत द्या, यासाठी नागरिकांनी त्यांच्याकडे तगादा लावला होता. सातारकर पिता-पुत्रांनी धनादेशाचे वाटप केले होते.
ते धनादेश बँकेत वटत नसल्याने फसविल्या गेलेल्या नागरिकांनी पोलिसांत तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्या धास्तीने शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सातारकर यांनी बंगल्याच्या वरच्या मजल्यावरील जिन्याला दोर बांधून गळफास घेतला.
हा प्रकार समोर आल्यावर सातारकरांना घाटीत दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आली.