परतूर जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग कार्यालय उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:13 AM2017-08-31T00:13:47+5:302017-08-31T00:13:47+5:30
कुठलीही पूर्व सूचना न देता नगरपालिकेने जेसीबीच्या साह्याने संरक्षक भिंतच पाडून टाकल्यामुळे जिल्हा परिषदेचे कार्यालय उघड्यावर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : कुठलीही पूर्व सूचना न देता नगरपालिकेने जेसीबीच्या साह्याने संरक्षक भिंतच पाडून टाकल्यामुळे जिल्हा परिषदेचे कार्यालय उघड्यावर आले आहे. जि.प. च्या उप अभियंत्यांनी मुख्याधिकाºयांना नुकसानभरपाईचे पत्र दिल्याने आता हा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.
परतूर येथे जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाचे कार्यालय रेल्वे स्टेशन जवळ वाटूर कडे जाणाºया मुख्य रोडवर आहे. या कार्यालयास अर्धवट बांधकाम केलेली संरक्षक भिंत होती. ही भिंत अचानक एके दिवशी नगर पालिकेने जेसीबीच्या जमीनदोस्त केली.
तसेच एक लिंबाचे झाडही तोडण्याचा प्रयत्न केला. ही भिंत पाडल्याने आता हे कार्यालय उघड्यावर आले आहे. नगर पालिका व बांधकाम विभाग हे दोन्ही शासनाचे कार्यालय आहेत. कुठलाही पत्र व्यवहार न करता पालिकेने सरळ भिंतच पाडण्याचा कार्यक्रम पहाटे ६ ते ८ वाजे दरम्यान केला आहे. यावेळी एक नगरसेवकही उपस्थित होते. ही कारवाई कोणाच्या दबावाने की, आदेशाने करण्यात आली, याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. आता हा वाद रंगण्याची चिन्ह दिसून लागली आहेत.
जि. प. बांधकाम विभागाचे उपअभियंता रजनीकांत दिवेकर यांनी नगर पोलिकेच्या मुख्याधिकाºयानां पत्र पाठवून सदरील भिंत विना परवानगी व कुठलीही कायदेशीर क ार्यवाही न करता पाडली आहे.
यामुळे २ लाख ६६ हजारांचे नुकसान झाले आहे. ही पाडलेली भिंत तत्काळ बांधून द्यावी, असे पत्रात म्हटले आहे. यावर मुख्याधिकाºयांनी काहीच उत्तर दिले नसल्याचे सांगण्यात येते. एकूणच आता ही भिंत पाडण्याची कारवाई का करण्यात आली याची शहरात चर्चा सुरू असण्या बरोबरच उपअभियंत्यांनी भिंत बांधून देण्याचे पत्र दिल्याने हे प्रकरण कोणावर शेकते याकडेही नागरिकांचे लक्ष आहे.