‘बायोमेडिकल वेस्ट’ साठी नव्या जागेत बांधकाम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 09:48 PM2018-12-31T21:48:27+5:302018-12-31T21:48:44+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) प्रशासनाने बायोमेडिकल वेस्ट साठविण्यासाठी नव्या जागेत कक्षाचे बांधकाम सुरू झाले आहे. आठवडाभरात हे बांधकाम पूर्ण होणार आहे.

Construction of new space for 'Biomedical West' continues | ‘बायोमेडिकल वेस्ट’ साठी नव्या जागेत बांधकाम सुरू

‘बायोमेडिकल वेस्ट’ साठी नव्या जागेत बांधकाम सुरू

googlenewsNext

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) प्रशासनाने बायोमेडिकल वेस्ट साठविण्यासाठी नव्या जागेत कक्षाचे बांधकाम सुरू झाले आहे. आठवडाभरात हे बांधकाम पूर्ण होणार आहे. त्यामुळे उघड्यावर वैद्यकीय घनकचरा साठविण्याचा प्रकार बंद होईल.


घाटीत मूत्रपिंड विकार विभागाच्या परिसरात बायोमेडिकल वेस्ट साठविल्याने मोकाट कुत्र्यांच्या तोंडी मानवी मांसाचे गोळे दिसत आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने १८ डिसेंबर रोजी प्रकाशित केलेल्या वृत्ताची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घाटीत पाहणी केली. यावेळी अधिकाºयांनी कचºयाचे वर्गीक रण, चुकीच्या पद्धतीने खड्ड्यांमध्ये विल्हेवाट आणि उघड्यावर बायोमेडिकल वेस्ट साठविणे यावर बोट ठेवले.


प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावून उघड्यावर बायोमेडिकल वेस्ट साठविण्याचा प्रकार बंद करण्याची सूचना केली. त्यामुळे घाटी प्रशासनाकडून मूत्रपिंड विकार विभागाच्या परिसरात मोकळ्या जागेत कचरा साठविणे बंद करण्यासाठी अन्य जागेचा शोध घेण्यात आला. अखेर शवविच्छेदनगृहासमोरील जागा निश्चित झाली. जागा निश्चित झाल्यानंतर कचरा साठविण्यासाठी कक्षाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी वर्गीकरणानुसार कचरा साठविण्यासाठी रचना केली जाणार आहे. त्यामुळे कचरा उघड्यावर साठविण्याचा प्रकार बंद होणार आहे. शिवाय बायोमेडिकल वेस्ट आणि ओला-सुका कचरा एकत्र येणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


नियमांचे पालन
घाटीत वैद्यकीय घनकचरा विल्हेवाटीच्या नियमांचे पालन केले जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार कचरा साठविण्यासाठी कक्षाचे बांधकाम करण्यात येत आहे.
-डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधीक्षक, घाटी
 

Web Title: Construction of new space for 'Biomedical West' continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.