बजाजनगरमध्ये पार्किंगच्या जागेवर बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 07:30 PM2018-11-23T19:30:38+5:302018-11-23T19:30:55+5:30

वाळूज महानगर : बजाजनगरातील महावीर कॉम्पलेक्समधील काही गाळे धारकांनी पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण करुन अनधिकृत बांधकाम केले आहे. सदर बांधकाम ...

 Construction of parking space in Bajajnagar | बजाजनगरमध्ये पार्किंगच्या जागेवर बांधकाम

बजाजनगरमध्ये पार्किंगच्या जागेवर बांधकाम

googlenewsNext

वाळूज महानगर : बजाजनगरातील महावीर कॉम्पलेक्समधील काही गाळे धारकांनी पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण करुन अनधिकृत बांधकाम केले आहे. सदर बांधकाम काढण्याची मागणी इतर गाळेधारकांकडून केली जात आहे. पण एमआयडीसी प्रशासन अतिक्रणधारकांना केवळ नोटिसा देवून थेट कारवाई करण्यास कुचराई करीत आहे. गाळेधारकांसह नागरिकांची वाहने रस्त्यावर लावली जात असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.


येथील महाराणा प्रताप चौकालगत एमआयडीसीच्या भूखंड क्रमांक पी- ११८ वर दोन मजली महावीर कॉम्पलेक्स बांधण्यात आले असून, एकूण ३३ गाळेधारक आहेत. कॉम्पलेक्सच्या चारही बाजूने पार्किंगसाठी तसेच काही दुर्घटना घडल्यास मोठ्या वाहनाला ये-जा करता यावी यासाठी जवळपास १० ते १२ फूट मोकळी जागा सोडण्यात आली आहे. काही गाळेधारकांनी मोकळ्या जागेवरच ५ ते ६ फूट अतिक्रमण करुन अनधिकृत बांधकाम केले आहे. तसेच सेप्टी टँकवरही बांधकाम केल्याने हा रस्ताच बंद झाला आहे.

पार्किंगची जागा गायब झाल्याने वाहने रस्त्यावर उभी रहात आहेत. त्यामुळे रहादारीस अडथळा निर्माण होऊन वाहतुकीचा खोळंबा आहे. सायंकाळी वाहतूक कोंडी होत असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. पार्क केलेली वाहने वाहतूक पोलीस उचलून नेत असल्याने ग्राहकांची संख्या रोडावली आहे. दुसरीकडे व्यवसायावर परिणाम होत असल्याने काही गाळेधारक व्यवसायिकांनी सदरील अतिक्रमण काढण्याची एमआयडीसीकडे अनेकवेळा मागणी केली आहे.

तक्रारीच्या अनुषंगाने एमआयडीसीने काही दिवसांपूर्वी राजकीय दबावापोटी ठोस कारवाई न करता केवळ थातूरमातूर कारवाई करुन अतिक्रमण हटविल्याचा देखावा केला. अतिक्रमण धारकांना नोटिसा देवून अवैध बांधकाम काढून घेण्यास सांगितले. परंतू अतिक्रमण धारकांनी नोटिशीला केराची टोपली दाखविली. एमआयडीसीने पुन्हा नोटिसा बजावल्या तरीही बांधकाम काढले गेले नाही.

तक्रार करुनही एमआयडीसी अतिक्रमण न काढता केवळ नोटिसा वर नोटिसा देवून अतिक्रमणधारकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप येथील अन्य गाळेधारकांडून केला जात आहे. या विषयी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.


एमआयडीसीच्या भूमिकेविषयी शंका
पार्किंगसाठी जागा नाही. रस्त्यावर उभी असलली ग्राहकांची वाहने पोलीस घेवून जातात. याचा धंद्यावर परिणाम होत आहे. एमआयडीसी कारवाई करण्याऐवजी नियम डावलून अतिक्रमणधारकांना मुदतवाढ देत असल्याने एमआयडीसीच्या भूमिकेविषयी शंका निर्माण होत आहे, असे तक्रारदार महावीर धुमाळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title:  Construction of parking space in Bajajnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.