कन्नड तालुक्यातील इंग्रजी माध्यम संस्थाचालकांच्या बैठकीत विधायक निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:04 AM2021-06-10T04:04:52+5:302021-06-10T04:04:52+5:30
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी इंग्रजी शाळांनी फक्त १५ टक्के फीसमध्ये सवलत द्यावी, असे ...
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी इंग्रजी शाळांनी फक्त १५ टक्के फीसमध्ये सवलत द्यावी, असे सूचित केले आहे, तरीदेखील सामाजिक बांधिलकी ठेवत २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांसाठी शहरी भागातील इंग्रजी शाळा १८ टक्के व कन्नड ग्रामीण भागातील स्कूल फीसमध्ये २५ टक्के सवलत देतील, असा सर्वानुमते बैठकीत निर्णय घेण्यात आला. तसेच नवीन शैक्षणिक वर्षासाठी शासनाच्या सूचनेप्रमाणे ऑनलाइन शिक्षण सुरू करून पालकांकडून किमान ६ ते १० हजार रुपये फीस घेऊन नियमितपणे ऑनलाइन क्लास सुरू करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी वाटचाल सुरू ठेवण्याचा संकल्प बैठकीत घेण्यात आला. आरटीई परिपूर्तीसाठी राज्य संघटनेसोबत राहून अन्यायाविरोधात संविधानिक मार्गाने लढा देण्याचा निर्णय घेतला गेला. पालक, नातेवाइकांकडून क्षुल्लक कारणावरून विनाकारण शिक्षकांशी वाद घातले जातात, अशा वेळी सर्व संस्थांनी एकीने पालकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याची भूमिका बैठकीत मांडली गेली.