जयभवानीनगरात दीडशे घरांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 01:09 AM2018-06-04T01:09:09+5:302018-06-04T01:09:39+5:30

जयभवानीनगर येथील तब्बल १५० घरांचा शनिवारी रात्रीपासून संपर्क तुटला आहे. घरात असलेल्या व्यक्तींना बाहेर पडणे कठीण झाले, तर बाहेरील व्यक्ती घरात जाऊ शकत नाही, अशी भयानक अवस्था निर्माण झाली आहे. महापालिकेने खोदून ठेवलेल्या नाल्यांमुळे हा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

Contact cut with 150 homes in Jai Bhwani nagar | जयभवानीनगरात दीडशे घरांचा संपर्क तुटला

जयभवानीनगरात दीडशे घरांचा संपर्क तुटला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जयभवानीनगर येथील तब्बल १५० घरांचा शनिवारी रात्रीपासून संपर्क तुटला आहे. घरात असलेल्या व्यक्तींना बाहेर पडणे कठीण झाले, तर बाहेरील व्यक्ती घरात जाऊ शकत नाही, अशी भयानक अवस्था निर्माण झाली आहे. महापालिकेने खोदून ठेवलेल्या नाल्यांमुळे हा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. नागरिकांना अक्षरश: मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. एवढे होऊनही शनिवारी फक्त सहा कर्मचारी नाल्यात काम करताना दिसून आले.
११ एप्रिल २०१७ रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर जयभवानीनगर परिसर पाण्यात बुडाला होता. या घटनेनंतर वसाहतीमधील नाल्यात असलेले अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने चिरीमिरी न देणाऱ्यांच्या इमारतींवर हतोडा चालविला. अतिक्रमणे पाडल्यानंतर काही महिने मलबा तसाच पडून होता. दीड महिन्यापूर्वी महापालिकेने नाला १५ फूट रुंद आणि आठ ते दहा फूट खोल केला. या नाल्यात भूमिगत गटार योजनेचे पाईप, मेनहोल तयार करण्यात आले आहेत.
पहिलाच पाऊस
शनिवारी सायंकाळी झालेला वादळी वारा आणि त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसानंतर जयभवानीनगर पुन्हा एकदा मागील वर्षीप्रमाणेच जलमय झाला. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. घरगुती सामानासह धान्यही खराब झाले. ठिकठिकाणी असलेले ड्रेनेजचे चेम्बर ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले. प्रत्येक रस्त्यावर किमान गुडघ्यापर्यंत येईल एवढे पाणी साचले. महापालिकेने ज्या दीडशे घरांसमोर नाला रुंद आणि खोल करून ठेवला त्या नागरिकांचे सर्वात जास्त हाल सुरू झाले. त्यांना घरातून बाहेर येता येईना.
त्रस्त नागरिकांचा जनआक्रोश
जयभवानीनगर येथे नाल्याच्या दोन्ही बाजूला राहणा-या १५० पेक्षा अधिक घरांमधील एक हजारांपेक्षा अधिक नागरिक मागील २४ तासांपासून ताटकळत बसले आहेत. मनपाच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड चीड, संताप आणि आक्रोश पाहायला मिळत आहे. योग्य नियोजनच नव्हते तर नाला कशासाठी रुंद केला, असा संतप्त सवालही नागरिकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांनी महापौरांसमोरच आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
जयभवानीनगरातील शंभू सहानी यांच्या घरात पॅरालिसिस झालेली व्यक्ती आहे. त्यांना उपचारासाठी घरातून बाहेर आणणे अवघड आहे. सुभाष टाळकर, रेवजीनाथ पवार, भगवान साळुंके यांच्या घरात ये-जा करण्यासाठी रस्ताच नाही. लता पवार या महिलेच्या घरातील धान्य पाण्यात भिजून मोठे नुकसान झाले. शारदा पातळक यांनी पंधरा दिवसांपासून पाण्याचे टँकर आले नसल्याचे नमूद केले.

Web Title: Contact cut with 150 homes in Jai Bhwani nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.