गुरुनानक जयंतीनिमित्त अखंड पाठ सुरू
By | Published: November 29, 2020 04:04 AM2020-11-29T04:04:42+5:302020-11-29T04:04:42+5:30
गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभा, गुरू गोविंदपुरा (उस्मानपुरा)सह शहरातील अन्य दोन गुरुद्वारांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. यंदा गुरुनानक जयंतीनिमित्त ...
गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभा, गुरू गोविंदपुरा (उस्मानपुरा)सह शहरातील अन्य दोन गुरुद्वारांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. यंदा गुरुनानक जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात येणार नसल्याचा निर्णय गुरुद्वारा समितीने घेतला आहे. शनिवारी सकाळी ८ वाजेपासून अखंडपाठाला सुरुवात झाली आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता अखंडपाठाची सांगता होणार आहे. गुरुनानक जयंतीनिमित्त गुरुद्वारात दर्शन करण्यास येणाऱ्या प्रत्येक भाविकाला मास्क बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे, तसेच प्रत्येक भाविकाची थर्मल गनने तपासणी करण्यात येणार आहे. सॅनिटायझर लावण्यात येणार आहे. दर्शनासाठी एकावेळी २० ते २५ भाविकांनाच गुरुद्वारात सोडण्यात येणार आहे. त्यानंतर लंगरचे (प्रसाद) पॉकेट देण्यात येणार आहे, अशी माहिती, गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभा समितीचे अध्यक्ष हरविंदरसिंग बिंद्रा, सचिव कुलदीपसिंग नीर यांनी दिली.