‘वैद्यकीय’ची प्रवेश प्रक्रिया सुरू
By Admin | Published: June 28, 2014 01:08 AM2014-06-28T01:08:18+5:302014-06-28T01:21:04+5:30
औरंगाबाद : राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय आणि ४ दंत महाविद्यालयांतील अनुक्रमे एमबीबीएस आणि बीडीएस पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या
औरंगाबाद : राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय आणि ४ दंत महाविद्यालयांतील अनुक्रमे एमबीबीएस आणि बीडीएस पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना ३ जुलैपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
राज्यातील १८ वैद्यकीय महाविद्यालयांत एमबीबीएस प्रथम वर्षासाठी २ हजार ६० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. तर ४ शासकीय दंत महाविद्यालयांत २५० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. यातील काही जागा अखिल भारतीय स्तरावरून मेरिटनुसार भरण्यात येणार आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी १७ ते २१ जूनदरम्यान राज्यभर विद्यार्थ्यांकडून पसंती फॉर्म भरुन घेण्यात आले. या कालावधीत विद्यार्थ्यांचे बारावी बोर्ड परीक्षेतील गुण, सीईटीमधील त्यांचा गुणवत्ता यादीतील क्रमांक , जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, डोमीसाईल प्रमाणपत्र आदींची तपासणी करण्यात आली.