एकाच कंत्राटदाराला १० वर्षांपासून विद्यापीठ सुरक्षारक्षक नेमण्याचे कंत्राट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:04 AM2020-12-30T04:04:36+5:302020-12-30T04:04:36+5:30
१० वर्षांपासून सुरक्षारक्षकाचे कंत्राट एकाच व्यक्तीला का? असा सवाल सुनील मगरे यांनी उपस्थित करून यात गाैडबंगालचा संशय व्यक्त केला. ...
१० वर्षांपासून सुरक्षारक्षकाचे कंत्राट एकाच व्यक्तीला का? असा सवाल सुनील मगरे यांनी उपस्थित करून यात गाैडबंगालचा संशय व्यक्त केला. त्यावर आधीच्या कुलगुरुंच्या आणि व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेने हे कंत्राट दिले गेल्याचे कुलगुरुंनी सांगितले. व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर म्हणाले, तीन महिन्यांपूर्वी ही बाब निदर्शनास आल्यावर उपसमितीच्या बैठकीत नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. १० दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीतही तशा सूचना दिल्याने ही प्रक्रिया सुरू झाली असावी, त्यासंबंधी कुलसचिवांनी स्पष्टीकरण द्यावे. कुलसचिव डाॅ. जयश्री सूर्यवंशी यांनी यासंबंधी ड्राफ्ट तयार झाला असून प्रक्रिया सुरू असल्याचे उत्तर दिले. त्यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. तर कुलगुरुंनी निविदा प्रक्रियेला गती देण्यात येईल, ३१ मार्चपूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण होईल, असे आश्वस्त केल्यावर विषयावर पडदा पडला.