महापुरुषांप्रमाणेच सैनिकांचे योगदान बहुमूल्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:04 AM2021-03-08T04:04:42+5:302021-03-08T04:04:42+5:30
गंगापूर : देश घडविण्यात ज्याप्रमाणे महापुरुषांचे योगदान आहे, त्याचप्रमाणे सीमेवर जिवाची पर्वा न करता भारतमातेची सेवा करणाऱ्या सैनिकांचे योगदान ...
गंगापूर : देश घडविण्यात ज्याप्रमाणे महापुरुषांचे योगदान आहे, त्याचप्रमाणे सीमेवर जिवाची पर्वा न करता भारतमातेची सेवा करणाऱ्या सैनिकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी केले. सीमेवर शहीद झालेले गंगापूर तालुक्यातील झोडेगाव येथील सैनिक सचिन नरेंद्रसिंग परदेशी यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, ज्याप्रमाणे देशसेवा हीच ईश्वरसेवा आहे, अगदी त्याचप्रमाणे समाजातील उपेक्षित घटकांची सेवा करणे ही देखील देशसेवाच आहे. जिजाऊ, शिवबा, महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग आदी महापुरुषांच्या विचारावर आजही देशाची वाटचाल सुरू आहे. मानवाने गरजवंतांना मदत केली पाहिजे. तीच खरी महापुरुष व सैनिकांना मानवंदना ठरेल. शहीद सचिन हे आपल्या सर्वांचे भूषण असून गावात व परिसरात एकोपा ठेवून त्यांच्या स्वप्नातील समाज उभा करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी अर्जुनगिरी महाराज, सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, शहीद सचिन यांच्या पत्नी सोनाली परदेशी व त्यांच्या दोन मुलांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
फोटो : झोडेगाव येथे शहीद जवान सचिन नरेंद्रसिंग परदेशी यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात बोलताना सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज.
070321\20210307_114735_1.jpg
महापुरुषांप्रमाणेच सैनिकांचे योगदान बहुमुल्य