गावोगावी सजल्या संस्कृतीच्या वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:40 AM2017-08-22T00:40:56+5:302017-08-22T00:40:56+5:30

शेतात न थकता, शेतकºयांना मदतीचा हात न आखडता, राबणारी बैलाची महती गायली जाणारी परंपरा आजही टिकून आहे. शहरासह ग्रामीण भागात कृषी प्रधान संस्कृतीच्या जुन्या वाटा गावोगावी सजल्या. ही नवोदित कवयित्री अनिता दाणे-जुंबाड यांच्या काव्यातील कल्पकता तालुक्यात पोळासणानिमित्त अनुभवयाला मिळाली.

Contribution to the village culture | गावोगावी सजल्या संस्कृतीच्या वाटा

गावोगावी सजल्या संस्कृतीच्या वाटा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कंधार: शेतात न थकता, शेतकºयांना मदतीचा हात न आखडता, राबणारी बैलाची महती गायली जाणारी परंपरा आजही टिकून आहे. शहरासह ग्रामीण भागात कृषी प्रधान संस्कृतीच्या जुन्या वाटा गावोगावी सजल्या. ही नवोदित कवयित्री अनिता दाणे-जुंबाड यांच्या काव्यातील कल्पकता तालुक्यात पोळासणानिमित्त अनुभवयाला मिळाली.
बालाघाट डोंगराने विस्तारित झालेल्या कुशीत तालुका वसला आहे. कोरडवाहू शेतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने निसर्गाची साथ असल्यास शेतकºयांच्या घरात अन्नधान्य मोठ्या प्रमाणात असते. उत्पन्न वाढून आर्थिक सुबत्त सुधारते. शेतकरी जसा शेतीत राबराबम राबतो. तसेच शेतकºयांच्या मदतीला बैल राबतो. उन्ह, पाऊस, थंडी, भार, ठणकपणा आदींची तमा न बाळगता तो साथ साथचे धोरण प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करतो.
शेती पिकली तरच शेतकरी सण, उत्सव आनंदाने साजरा करतो. यावर्षी पावसाअभावी शेतातील पिकांची स्थिती चिंताजनक होती. मूग, उडीद हातचे गेल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता. उर्वरित पिके हाती लागतील का, या विषयी तो साशंक होता. परंतु १९ आॅगस्टपासून पावसाने प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन केले आणि शेतकºयांत उत्साह संचारला. पावसाने शिवाराचा नूर पालटून गेला आणि कवयित्री अनिता दाणे यांची कविता पोळा सण साजरा करायला शेतकºयांना बळ कसे आले. त्याचे वर्णन त्यात केले.
पुन्हा बरसल्या धुंद
पाऊसाच्या सरी
आनंदाचे उधान
चैतन्य आले वसुंधरा दारी
मानवी (शेतकरी) चिंता
खळखळ वाहून गेल्या
कृषी प्रधान संस्कृतीच्या वाटा
गावोगावी सजल्या
शेतकºयाला तारुण पोळा साजरा झाला. हे चित्र कंधार शहर आणि परिसरातील गावागावात, वाडीतांड्यावर प्रकर्षाने दिसून आले.

Web Title: Contribution to the village culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.