सोशल मीडियातील पोस्टवरुन वाद; निवडणूक न लढविण्याच्या धमकी देत तरुणाला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 05:13 PM2021-02-13T17:13:39+5:302021-02-13T17:19:32+5:30

Young man beaten to death for threatening not to contest elections in Aurangabad निवडणुक लढवू नकोस, त्या संदर्भात पोस्ट टाकू नको म्हणत केली मारहाण 

Controversy over posts on social media; Young man beaten to death for threatening not to contest elections | सोशल मीडियातील पोस्टवरुन वाद; निवडणूक न लढविण्याच्या धमकी देत तरुणाला बेदम मारहाण

सोशल मीडियातील पोस्टवरुन वाद; निवडणूक न लढविण्याच्या धमकी देत तरुणाला बेदम मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्देबजाजनगरात तरुणास मारहाण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वाळूज महानगर : निवडणुकीला उभे राहू नकोस आणि त्यासंदर्भात सोशल मीडियात पोस्टसुद्धा टाकू नकोस असे धमकावत एकाला बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय मदन काळे (२३ रा.वडगाव) हे रांजणगाव परिसरात हॉटेल चालवितो. गुरुवारी रात्री हॉटेल बंद केल्यानंतर अक्षय हॉटेलमधील कामगार ऋषिकेश सोनवणे याच्यासोबत दुचाकीवरून घराकडे चालले होते. एनआरबी चौकातून जात असताना रात्री १०.३० वाजेच्या सुमारास अक्षयला अजय प्रधान व त्याच्या सोबत असलेल्या साथीदारांनी दुचाकी थांबविण्यास सांगितले. मात्र अक्षयने दुचाकी पळविली. बजाजनगरच्या लीलासन हॉस्पिटलजवळ पाठलाग करून अजय व त्याच्या साथीदाराने त्यास पकडले. 

अजयने अक्षय यास तू ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी करू नकोस, फेसबुकवर निवडणूकसंदर्भात पोस्ट टाकू नको, असे म्हणून वाद घालत मारहाण केली. लगतच्या हॉटेलचे चालक गिरी यांनी मध्यस्थी करून अक्षयची सुटका केली. या मारहाणप्रकरणी ५ जणांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Controversy over posts on social media; Young man beaten to death for threatening not to contest elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.