Corona In Aurangabad : आणखी ६ मृत्यू; १०८ बाधितांची वाढ, एकूण रुग्णसंख्या ३२२४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 07:32 PM2020-06-19T19:32:32+5:302020-06-19T19:33:50+5:30

हर्सूल कारागृहात आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह

Corona In Aurangabad: 6 more deaths; Increase of 108 infected, total number of patients 3224 | Corona In Aurangabad : आणखी ६ मृत्यू; १०८ बाधितांची वाढ, एकूण रुग्णसंख्या ३२२४

Corona In Aurangabad : आणखी ६ मृत्यू; १०८ बाधितांची वाढ, एकूण रुग्णसंख्या ३२२४

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ९१ कोरोनाबाधितांची वाढ झाल्यानंतर दुपारी आणखी १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या ३२२४ झाली आहे. तर आणखी सहा बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण कोरोना बळींची संख्या १७७ झाली आहे. १७६३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

घाटी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, घाटी परिसरातील ४५ वर्षीय व्यक्तीला १७ जून रोजी भरती करण्यात आले होते. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपश्चात त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. शिवशंकर कॉलनी येथील ६४ वर्षीय वृद्धाला ३१ जून रोजी घाटीत भरती करण्यात आले होते. उच्च रक्तदाब, कोरोनामुळे न्युमोनिया, सेप्टिक शॉक सेप्टीसीमियामुळे त्यांचा गुरुवारी दुपारी एक वाजता मृत्यू झाला. आझाद चौक, रहिमनगर येथील ४४ वर्षीय रुग्णाला गुरुवारी भरती करण्यात आले होते. त्यांच दिवशी सायंकाळी ६.४५ त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपश्चात त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यांना तीव्र श्वसन विकार व कोरोनामुळे न्युमोनिया त्यांच्या मृत्यूचे कारण देण्यात आले.

रोशन गेट येथील ६५ वर्षीय महिलेला गुरुवारी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी ६.४५ वाजता त्यांचा कोरोनामुळे तीव्र श्वसन विकार, न्युमोनिया, उच्चरक्तदाबामुळे त्यांचा मृत्यू झाला. रहेमानिया कॉलनी येथील ६५ वर्षीय वृद्धाला १३ जुन रोजी भरती करण्यात आले होते. गंभीर किडनी विकाराने ते ग्रस्त होते. त्यांना कोरोनामुळे तीव्र श्वसनविकार, न्युमोनीया झाल्याने त्यांचा मृत्यु शुक्रवारी पहाटे तीन वाजता झाला. आकाशवाणी परीसरातील ६७ वर्षीय व्यक्तीला १० जुन रोजी भरती करण्यात आले होते. मधुमेह, उच्चरक्तदाबासह कोरोनामुळे तीव्र श्वसनविकार, न्युमोनियामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने कळवले आहे.

आज १०८ बाधितांची वाढ
आज आढळलेल्या रुग्णांत हर्सूल कारागृह ५, एसबी नगर १, उस्मानपुरा ३,  बजाज नगर २, अहिंसा नगर १, अंगुरी बाग १, जहाँगीर कॉलनी १, लोटा कारंजा १, खामगाव, फुलंब्री १,  झाकीर हुसेन कॉलनी, सिल्लोड १, राजननगर १, बायजीपुरा १, रहिमनगर १, युनूस कॉलनी १, हनुमान चौक चिकलठाणा १, रामनगर १, बजाजनगर २, रशीदपुरा १, नारळीबाग २, क्रांतीनगर १, अंबिकानगर १, पुंडलिकनगर ३, नागेश्वरवाडी २, नक्षत्रवाडी १, हर्सूल २, एन-९ सिडको २, एन-११ सिडको २, मिलकॉर्नर १, एन-५ सिडको १, एन-८ सिडको १, शिवाजीनगर १, जाधववाडी २, शंभूनगर ४,  चिकलठाणा ५, रामकृष्णनगर २, ईटखेडा २, विश्वभारती कॉलनी २, बीड बायपास १, न्यू हनुमाननगर २,  जयहिंदनगर, पिसादेवी १, भानुदासनगर १, श्रीविहार कॉलनी, बीड बायपास ३, जाधववाडी १, पळशी १, आरिश कॉलनी १, गौतमनगर, प्रगती कॉलनी १, द्वारकानगर, हडको १, समतानगर १, शिवाजीनगर २, लहूनगर २, रामनगर १, ब्रिजवाडी १, शहानूरवाडी ४, मुजीब कॉलनी ५, रामेश्वरनगर २, न्यू विशालनगर १, मयूरनगर १, बुढीलेन १, सह्याद्री हाऊसिंग सोसायटी १,  सिडको महानगर १, लोकमान्य चौक, बजाजनगर २, सुयोग हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर ४, साऊथ  सिटी, सिडको महानगर १, शिवशंभो हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर १, शिवालय चौक, बजाजनगर १, सारा गौरव, बजाजनगर १ या भागांतील कोरोनाबाधित आहेत. 

Web Title: Corona In Aurangabad: 6 more deaths; Increase of 108 infected, total number of patients 3224

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.