CoronaVirus In Aurangabad : सुटकेचा आणखी एक निःश्वास... गेल्या दोन दिवसातील 23 अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 12:37 PM2020-03-26T12:37:53+5:302020-03-26T12:45:04+5:30
शहरात या आधी 54 अहवाल निगेटिव्ह आले आहेत
औरंगाबाद : कोरोनाच्या सावटाखाली शहरवासीय असताना 23 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची दिलासादायक माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे. शहरात या आधी 54 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आता 23 संशयित निगेटिव्ह असल्याने आरोग्य यंत्रणेने काही काळ सुटकेचा निःश्वास घेतला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.व्ही.कुलकर्णी यांनी सांगितले.
एका महिला प्राध्यापिकेचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आल्यानंतर शहरातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीमुळे सातत्याने शहरात कोरोना संशयितांची भर पडत गेली. दरम्यान, उपचारानंतर पॉसिटीव्ह असलेल्या महिला प्राध्यापिकेचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.तसेच शहरात या आधी 54 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.यानंतर मागील दोन दिवसात दाखल रुग्णांचे 23 अहवाल देखील निगेटिव्ह आले आहेत. सध्या शहरात एकही पॉसिटीव्ह रुग्ण नाही आणि सर्व संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण थोडासा हलका झाला आहे.